लाइव्ह टीव्ही
open in app

Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Updated Feb 08, 2023 | 21:59 IST

Maharashtra government announce Maharashtra Bhushan Puraskar to Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

Loading ...
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
  • आप्पासाहेब धर्माधिकारी 30 वर्ष निरुपण करत आहेत

Maharashtra government announce Maharashtra Bhushan Puraskar to Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केले. यानंतर रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.  

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप

२५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे  महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी

14 मे 1946 रोजी जन्म झालेले  पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी 30 वर्ष निरुपण करत आहेत. बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरू केल्या आणि  आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.

Advertising
Advertising

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. वृक्षसंवर्धन,तलाव निर्मिती, तलावातील गाळ उपसणे, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजन हे उपक्रम डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नियमितरीत्या राबविण्यात येतात. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात   

इंधन खर्चात होणार बचत, बाजारात येणार नवे Petrol
Amrit Udyan मध्ये हे बघाल तर चक्रावून जाल

Loading ...

कोण आहेत .दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी?

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

Loading ...