मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने (National Testing Agency) सोमवारी NEET २०२० (NEET 2020) पुढे ढकलण्यात येण्याच्या सर्व शक्यता दूर केल्या. तसेच NTAकडून अधिकृत नोटिस (official notice from NTA) काढण्यात आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे की नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (National Eligibility com Entrance Test) (NEET) ठरल्याप्रमाणे १३ सप्टेंबर (13th September) रोजी घेण्यात येईल. NEET २०२०ची प्रवेशपत्रे NTA NEETचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in इथे (admit cards available on official website) मिळतील.
या नोटिसमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ९९% परीक्षार्थींना त्यांनी निवडलेले पहिलेच परीक्षा केंद्र मिळाले आहे. ही परीक्षा देण्यासाठी एकूण १५.९७ लाख नोंदणीकृत परीक्षार्थी यावर्षी आहेत. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यासाठी NEET २०२०ची परीक्षाकेंद्रे २५४६वरून ३८४३वर नेण्यात आली आहेत. यावर्षी कोरोनाच्या संकटाच्या काळात परीक्षा घेण्यासाठी एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपायांबद्दल विद्यार्थी इथे पाहू शकतात.
NEET २०२० परीक्षा २ ते ५पर्यंत आणि पेन-पेपर पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र) हे विषय असतील आणि १८० प्रश्न असतील. NEET परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने घेण्यात येईल. इतर तपशील जाणून घेण्यासाठी NTA NEETच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.