नवी दिल्ली :पावसाळ्याच्या दिवसात (Monsoon season) डोंगराळ प्रदेश (hilly areas) जास्त असलेल्या राज्यांमध्ये (states) ढगफुटी (cloud burst) होण्याची शक्यता जास्त असते. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) काल म्हणजेच सोमवारी ढगफुटी झाली. ढगफुटी म्हणजेच कमी वेळात (less duration) खूप जास्त पाऊस (heavy rains) होणे. ढगफुटी झाल्याचा थेट परिणाम पूरपरिस्थिती (flood situation) निर्माण होण्यात दिसून येतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. हिमाचल प्रदेशातल्या ढगफुटीमुळे कांगडा (Kangda), धर्मशाळा (Dharamsala) आणि कुलू (Kullu) या प्रदेशांमध्ये मोठा पूर (floods) आला आहे.
कुलूचे अपर उपायुक्त प्रकाश सिंह यांनी सांगितले आहे की प्रशासनाने इथे येत्या 3 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कुलू जिल्ह्यातील किमान 25 रस्ते बंद आहेत. आठ ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इथल्या विविध विभागांकडून झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवण्यात आला आहे. जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कांगडा जिल्ह्यातील बोह खोऱ्याच्या परिसरात बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. सोमवारी ढगफुटी झाल्यानंतर आलेल्या पुरामुळे या भागात भरपूर हानी झाली आहे.
हवामान विभागाचे म्हणणे आहे की, सध्या ढगफुटीची परिस्थिती नाही, पण डोंगराळ भागात वातावरण बदलण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे खालच्या भागात राहणाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खासकरून लोकांनी झरे किंवा पावसाळ्यात पाणी येणाऱ्या नाल्यांकडे जाऊ नये असे सांगितले गेले आहे. या पुरामुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारी सुविधा पुरवण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.