VIDEO: दुकानात शिरले अन् बंदुकीच्या धाकावर फिल्मी स्टाईलमध्ये दुकान लुटले

लेखोजीराव
Updated Aug 18, 2022 | 16:54 IST

Video of robbery: बंदुकीच्या धाकावर दुकान लुटल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Robbery caught in CCTV: सोशल मीडियात एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एक टोळी दुकानात शिरते आणि त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत ते दुकान लुटतात. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकान मालकाकडून ६ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. (Goons robbed shop on gun point caught in cctv watch video)

ही घटना उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास, येथील व्यापारी आरपी गुप्ता आणि त्यांचा भाऊ ललित मोहन हे दुकानात बसले असताना दरोडेखोर आले. दरोडेखोरांनी दुकानात शिरताच बंदुकीचा धाक दाखवत पैसे घेऊन पळाले. इतकेच नाही तर त्यांना विरोध करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण सुद्धा केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी