टेक्स्टाईल क्षेत्रात 36 हजार कोटींची सरकारी गुंतवणूक होणार, 10 लाख नवे रोजगार निर्माण होणार

10 lakh jobs in textile sector rs 36000 crore investment by maharashtra government : महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग क्षेत्रात 36 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्रात किमान 10 लाख रोजगारांची निर्मिती करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवले आहे. 

investment by maharashtra government
टेक्स्टाईल क्षेत्रात 10 लाख नवे रोजगार निर्माण होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टेक्स्टाईल क्षेत्रात 36 हजार कोटींची सरकारी गुंतवणूक होणार
  • टेक्स्टाईल क्षेत्रात 10 लाख नवे रोजगार निर्माण होणार
  • महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

10 lakh jobs in textile sector rs 36000 crore investment by maharashtra government : महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग क्षेत्रात 36 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्रात किमान 10 लाख रोजगारांची निर्मिती करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवले आहे. 

वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगार निर्मितीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास महाराष्ट्र शासनाने व्यक्त केला. महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार सत्तेत आहे. हे सरकार विकासाकरिता वेगाने मोठे निर्णय घेऊन ते अमलात आणत आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाने वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील  गुंतवणुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. 

भारतातील एकूण कापूस उत्पादनापैकी 28 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. यातही मराठवाडा आणि विदर्भ येथील कापूस शेतीचे प्रमाण लक्षणीय आहे. याच कारणामुळे राज्य शासन  मराठवाडा आणि विदर्भ येथे वस्त्रोद्योग निर्मितीसाठी मोठे उद्योग उभारण्याची तयारी करत आहे. 

सध्या महाराष्ट्रात सुमारे 42 लाख हेक्टर भूखंडावर कापूस लागवड होते. कापूस शेतीवर राज्यातले सुमारे 45 लाख शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य अवलंबून आहेत. यामुळे सरकारी गुंतवणूक योजनेचा लाभ कापूस शेतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांना होणार आहे. 

राज्यात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी नव्याने उभ्या राहणाऱ्या उद्योगांना अनेक सवलती दिल्या जाणार आहेत. या उद्योगांना सवलतीच्या दराने विजेचा पुरवठा होणार आहे. कापसाचा दर स्थिर राहावा यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.

पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (पीएम मित्रा) योजनेंतर्गत अमरावती (विदर्भ) आणि औरंगाबाद (मराठवाडा) येथे येथे ब्राऊनफिल्ड पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव पण महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठविला आहे.

Bank Jobs: काय तुमचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालंय? काळजी नको तुम्हालाही मिळेल बँकेत नोकरी,आजच करा अर्ज

SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी