प्रेग्नेन्ट श्लोका मेहताने 'NMACC' मध्ये नेसली होती 100 वर्षापूर्वीची सोनेरी साडी, बहीण दीयाने केला खुलासा 

काम-धंदा
Updated Apr 11, 2023 | 22:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shloka Mehta : अंबानी यांची थोरली सून आणि उद्योजिका श्लोका मेहताच्या बहिणीने एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे की, 'NMACC' सोहाळ्यांत आपल्या प्रेग्नेंट बहिणीने कशा पद्धतीने 100 वर्षापूर्वीची साडी परिधान करून स्टाईल केली होती.

 नुकत्याच झालेल्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये श्लोकाने वेगवेगळ्या आऊटफिटमधून स्वतःमधले नावीन्यपण जपले.
Shloka Mehata in NMACC  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये श्लोकाने वेगवेगळ्या आऊटफिटमधून स्वतःमधले नावीन्यपण जपले.
  • श्लोकाची धाकटी बहीण आणि फॅशन इन्फ्लुएंसर दिया मेहताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने श्लोकाच्या 'NMACC' मधील तिन्ही दिवसांच्या लुक्सबद्दल तपशीलवार माहिती दिली
  • श्लोका मेहता आणि आकाश अंबानी आपल्या दुसऱ्या बाळाच्या तयारीला लागले आहेत. या जोपड्यांना आधी एक मुलगा असून, त्याचा जन्म 10 डिसेंबर 2022 रोजी झाला आहे. 

Shloka Mehata in NMACC : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत बिजनेसमेन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता एक उत्कृष्ट फेशनिष्टा आहे, आपल्या प्रत्येक स्टाईल आणि लूकद्वारे ती लोकांचे लक्ष वेधून घेत असते. नुकत्याच झालेल्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये श्लोकाने वेगवेगळ्या आऊटफिटमधून स्वतःमधले नावीन्यपण जपले. या तीन दिवसांमध्ये श्लोकाने निवडलेले लूक्स तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यास नक्कीच यशस्वी ठरले आहेत. (100 year old gold saree worn by pregnant Shloka Mehta in 'NMACC', sister Diya reveals)

अधिक वाचा : Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार

9 एप्रिल 2023 रोजी, श्लोकाची धाकटी बहीण आणि फॅशन इन्फ्लुएंसर दिया मेहताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने श्लोकाच्या 'NMACC' मधील तिन्ही दिवसांच्या लूक्सबद्दल तपशीलवार माहिती दिली. तसेच तिने आपल्या बहिणीची प्रेगनेन्सी लक्षात घेता कशी तीने 100 वर्ष जुन्या साडीत स्टाइल केली हे देखील सांगितले.

पहा हा व्हिडिओ

'NMACC'च्या पहिल्या दिवशी श्लोकाचा साडी लूक 

NMACC' च्या पहिल्या दिवशी, श्लोकाने गोल्डन हेअरलूम साडी घातली होती ज्यावर तिने काँट्रास्ट पिंक रेशमी दुपट्टा परिधान केला होता. या पारंपारिक लूकमध्ये श्लोका एकदम रॉयल दिसत होती, पण तिच्या या लूकची आणखीन एक खासियत म्हणजे तीने परिधान केलेली ही साडी तिच्या आईच्या 100 वर्ष जुन्या कपाटातून घेण्यात आली होती. या साडीवर खऱ्या सोन्याच्या तारेचे भरतकाम करण्यात आले होते, ज्यामुळे ती आणखीन खास बनली होती.

अधिक वाचा : ​Eknath Shinde Death Threat: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

NMACC' च्या 2 व्या दिवशी श्लोका विंटेज शाल-स्कर्टमध्ये झळकली

नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या या दिमाखदार सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी श्लोकाने अबू जानी संदीप खोसला यांच्या चिकणकारी स्कर्ट परिधान केला, ज्यावर तिने व्हिंटेज शाल स्टाईल केली होती. ज्यामुळे ती वेगळी आणि आकर्षक दिसून येत होती, शिवाय तिची ही स्टाईल तिला मॉडर्न लूक देत होता. 

तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, श्लोकाने सुप्रसिद्ध डिझायनर राहुल मिश्राच्या कलेक्शनमधील बेज रंगाचा ऑर्गेन्झा ड्रेस परिधान केला 
या सोहळ्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी श्लोकाने परिधान केलेल्या ऑफ-द-शोल्डर ड्रेसवर रफल डिटेलिंग आणि चमकीचे भरतकाम केले होते. या ड्रेसमध्ये श्लोकाने केलेली मॅटर्नीटी फॅशन लुक पाहण्यासारखा होता.

अधिक वाचा : ​Santacruz Murder Case :  प्रियकरासाठी पत्नीने पती आणि सासूला जेवणातून थोडं-थोडं विष देत मारलं

दीयाने श्लोकाच्या या उत्कृष्ट स्टाईलची तपशीलवार माहिती देताना स्वतःचा अनुभव देखील शेयर केला. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत तिने खाली कॅप्शनमध्ये लिहिले की "जेव्हा @shloka11 दीदी ने जेव्हा मला सांगितले की  NMACC च्या उद्घाटन सोहळ्यासाठी तिला स्टाईल देऊ तेव्हा मी खूप घाबरली होती. मी यापूर्वी तिच्यावर अनेक स्टाईल केल्या होत्या, पण यावेळी आमच्या दोघांची आवड वेगवेगळी होती. त्यामुळे मी सुवर्णमध्य काढला, कारण तिची प्रेग्नेंसी बघता ती स्वतःला सुंदर दिसण्याबरोबरच आऊटफिटमध्ये कंफर्टेबल देखील राहू पाहत होती. तसेच, तिच्या प्रेग्नेंसीचा खुलासादेखील होणार होता, म्हणून काही तरी विशेष जे कायमचे लक्षात राहील अशी स्टाईल तिला कारायची होती."

श्लोका मेहता आणि आकाश अंबानी आपल्या दुसऱ्या बाळाच्या तयारीला लागले आहेत. या जोपड्यांना आधी एक मुलगा असून, त्याचा जन्म 10 डिसेंबर 2022 रोजी झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी