PM Kisan Yojana: मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता लवकरच जमा होणार; अशी तपासा लाभार्थ्यांची यादी 

काम-धंदा
Updated Apr 15, 2022 | 16:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

PM Kisan Yojana Latest Updates । केंद्र सरकारने देशातील करोडो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये जमा करते.

11th installment of PM Kisan Yojana to be collected soon, Check the list of beneficiaries
पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता लवकरच जमा होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीएम किसान योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये जमा करते.
  • दर चार महिन्यांनी तीन वेळा दोन हजार करून ही रक्कम दिली जाते.
  • ११ व्या हप्त्यापूर्वी सरकारने ई-केवायसीची शेवटची तारीख वाढवली आहे.

PM Kisan Yojana Latest Updates । नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील करोडो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये जमा करते. दर चार महिन्यांनी तीन वेळा दोन हजार करून ही रक्कम दिली जाते. (11th installment of PM Kisan Yojana to be collected soon, Check the list of beneficiaries). 

शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत १० हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि आता पुढील हप्ता म्हणजेच ११ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत. माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता या महिन्यात काही दिवसात येऊ शकतो. शेवटच्या हप्त्याचे पैसे १ जानेवारी २०२२ रोजी जमा करण्यात आले होते. 

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत शेतकरी त्यांची नावे तपासू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना फक्त काही मिनिटे खर्च करावी लागणार आहेत. 

अधिक वाचा : जो रूटने इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा दिला राजीनामा

अशी तपासा लाभार्थ्यांची नावाची यादी 

१) सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
२) आता तुम्हाला येथे फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. 
३) येथे पुन्हा तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.
४) आता येथे तुम्हाला राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गाव इत्यादी माहिती भरायची आहे.
५) आता तुम्ही गेट रिपोर्टवर क्लिक करा. इथे तुम्हाला पीएम किसानमध्ये तुमच्या नावाशी संबंधित माहिती दिसेल. 

लक्षणीय बाब म्हणजे पीएम किसानच्या ११ व्या हप्त्यापूर्वी सरकारने ई-केवायसीची शेवटची तारीख वाढवली आहे. पीएम किसान योजनेच्या ई-केवायसीची शेवटची तारीख आधी ३१ मार्च होती, जी आता वाढवून २२ मे २०२२ करण्यात आली आहे. 

अशी करा ई-केवायसी (E-KYC)

१) pmkisan.gov.in या PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२) होम पेजच्या उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर' नावाच्या लिंकवर क्लिक करा.
३) आता ई-केवायसी या पहिल्या पर्यायावर क्लिक करा. 
४) आात तुमचा आधार कार्ड नंबर टाका. 
५) आता कॅप्चा कोड टाका आणि सर्च पर्यायावर क्लिक करा. 
६) आता आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. 
७) तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाइप करा.
८) तुमचे आधार कार्ड लिंक केले गेले आहे आणि ई-केवायसी पूर्ण झाली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी