Petrol, Diesel Price Today : दोन आठवड्यात 12वी दरवाढ; आज 40 पैशांनी कमी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 04, 2022 | 08:04 IST

आज सोमवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. पंरतु आज फक्त 40 पैशांनी दरवाढ झाली आहे. रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले होते.

Petrol, Diesel Price Today
Petrol, Diesel Price Today : दोन आठवड्यात 12वी दरवाढ  |  फोटो सौजन्य: Indiatimes

Petrol, Diesel Price : नवी दिल्ली:  आज सोमवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. पंरतु आज फक्त 40 पैशांनी दरवाढ झाली आहे. रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले होते. दरम्यान मागील दोन आठवड्यात इंधनाच्या दरात 12 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. म्हणजेच मागील चौदा दिवसात फक्त दोन दिवस दर वाढविण्यात आलेला नाही, अन्यथा पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत.या दोन आठवड्यात तेल प्रतिलिटर 8.40 रुपयांनी महागले आहे. आजच्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 103.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 95.07 रुपये झाला आहे. त्याचवेळी मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 118.83 रुपयांवर पोहोचला आहे. डिझेल 103.07 रुपये प्रति लिटर आहे. 

मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

दिल्ली    - पेट्रोल 103.81    डिझेल 95.07
कोलकाता -    पेट्रोल 113.45    डिझेल 97.22
मुंबई    - पेट्रोल  118.83    डिझेल 103.07
चेन्नई     -पेट्रोल 109.34    9 डिझेल 9.42

देशातील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारातील किमतींनुसार इंधन तेलाच्या देशांतर्गत किमती दररोज बदलेल्या जातात. हा नियम 2017 मध्ये लागू झाला. तेव्हापासून, देशातील प्रत्येक इंधन केंद्रावर दररोज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू होणार आहेत. केंद्र आणि राज्याची कर रचना वेगळी असल्याने, स्थानिक व्हॅट आणि इतर करांमुळे इंधन तेलाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. 

क्रमांकांवरुन जाणून घ्या इंधनाच्या किमती 

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याची माहिती तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर कोड सापडेल. इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx वर देखील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी