e-Shram Registrations: १६ कोटी असंघटीत कामगारांना जोडले गेले eshram.gov.in या पोर्टलशी, मिळणार या सुविधा...

Labour Shramik Card : केंद्र सरकारने मागील वर्षी देशभरातील कोट्यवधी कामगारांच्या कल्याणासाठी असंघटीत कामगारांची (unorganized workers)माहिती गोळा केली. मोदी सरकारने यासाठी ई-श्रम पोर्टल (e-SHRAM portal) विकसित केले आहे. याद्वारे कामगार त्यांचे आधार कार्ड लिंक करू शकणार आहेत. देशातील १६ कोटी पेक्षा जास्त असंघटीत कामगारांनी या पोर्टलवर याआधीच नोंदणी केली आहे.

Labour Shramik Card Registration
ई-श्रम पोर्टलवरील मजूरांची नोंदणी 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारने विकसित केले ई-श्रम पोर्टल
  • ई-श्रम पोर्टलवर १६ कोटी मंजूरांची नोंदणी
  • पोर्टलच्या साहाय्याने सामाजिक सुरक्षा योजनांचा मिळणार लाभ

Labour Shramik Card Registration news: नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागील वर्षी देशभरातील कोट्यवधी कामगारांच्या कल्याणासाठी असंघटीत कामगारांची (unorganized workers)माहिती गोळा केली. मोदी सरकारने यासाठी ई-श्रम पोर्टल (e-SHRAM portal) विकसित केले आहे. याद्वारे कामगार त्यांचे आधार कार्ड लिंक करू शकणार आहेत. देशातील १६ कोटी पेक्षा जास्त असंघटीत कामगारांनी या पोर्टलवर याआधीच नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टल अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. (16 crore unorganized workers join eshram.gov.in)

पोर्टलवरील नोंदणीसाठी शुल्काची गरज नाही

ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीसाठी कामगारांनी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. कॉमन सर्व्हिस सेंटर येथे यासाठी शुल्क देण्याची किंवा राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर कामगार स्वत:च eshram.gov.in ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतंर कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जाणार आहे. हे कार्ड एका युनिक युनिव्हर्सल अकाउंट नंबरसोबत मिळते. या कार्डद्वारे कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे कधीही आणि कुठेही घेता येणार आहेत.

कामगारांची सर्व माहिती ई-श्रम कार्डवर

ई-श्रम कार्ड मध्ये कामगारांचे नाव, काम, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि कुटुंबाची माहिती असणार आहे. यातून त्यांच्या रोजगाराची माहिती मिळणार आहे आणि त्याद्वारे त्यांच्यापर्यत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ पोचवता येणार आहेत. असंघटीत कामगारांची देशभरातील माहिती पहिल्यांदाच याप्रकारे गोळा करण्यात आली आहे. यात स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, विविध कामगारांचा समावेश आहे.

लेबर श्रमिक कार्डचे फायदे

ई-श्रम कार्ड देशभर लागू असणार आहे. नोंदणीनंतर कामगारांना अपघात विमा आणि पर्मनंट डिसेबलिटी विमा मिळणार आहे. शिवाय पार्शियल डिसेबिलिटी साठी विमा मिळणार आहे. ही रक्कम अनुक्रमे २ लाख आणि १ लाख रुपये असणार आहे. भविष्यात सामाजिक सुरक्षा फायद्यांसाठी कामगारांना याच पोर्टलवरून माहिती घेता येणार आहे आणि याच पोर्टलद्वारे त्यांना याचे लाभ मिळणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती आणि महामारीसारख्या संकट काळात कामगारांची ही माहिती त्यांना मदत करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. सर्व नोंदणीकृत असंघटीत कामगारांना विमा कवच दिले जाणार आहे. प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत वर्षभरासाठी हे विमा संरक्षण दिले जाणार आहे.

सरकारांना मजूरांना मदत पोचवणे होणार सोपे

असंघटित कामगारांची ही माहिती राज्य आणि केंद्र सरकारांना उपयुक्त ठरणार असून त्याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत आणि संकटकाळात कामगारांना मदत करण्यासाठी होणार आहे. २६ ऑगस्टपासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. बांधकाम मजूर, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील विक्रेते, घरातील नोकर, दूधवाले, ट्रक ड्रायव्हर, कोळी, शेतमजूर आणि इतर मजूरांना या ई-श्रम पोर्टलद्वारे संरक्षण दिले जाणार आहे.

कोरोना काळात मजूरांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले त्याची दखल घेत सरकारने हे पोर्टल सुरू केले आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी