1 रुपयात छापल्या जातात 20 रुपयांच्या नोटा, जाणून घ्या 2000च्या नोटा छापण्यासाठी येतो किती खर्च?

काम-धंदा
Updated Mar 26, 2021 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

ज्या नोटांची किंमत 2000 रुपये, 500 रुपये किंवा 200 रुपये असते त्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो याचा विचार आपण कधी केला आहे का? यात अनेक सुरक्षा फीचर्स असतात, मात्र हा खर्च आपल्या अंदाजापेक्षा बराच कमी आहे.

2000 rupees currency notes
1 रुपयात छापल्या जातात 20 रुपयांच्या नोटा, जाणून घ्या 2000च्या नोटा छापण्यासाठी येतो किती खर्च?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कुठे छापल्या जातात या नोटा?
  • 2000च्या नोटा छापण्यासाठी किती येतो खर्च?
  • इतर नोटांची काय आहे स्थिती?

भारतीय चलनातल्या (Indian currency) 2000 किंवा 500च्या नोटा (notes) दिसताना फक्त कागदासारख्या (paper) दिसतात, पण बाजारात (market) त्यांची किंमत (value) खूप असते. या नोटा एका विशिष्ट पद्धतीने (particular method) तयार केल्या जातात ज्या फक्त कागदासारख्या नसतात. या नोटांमध्ये असलेल्या सुरक्षिततेच्या फीचर्समुळे (security features) यांची ओळख निर्माण होते. यातील गांधीजींचा फोटो (Gandhi photo) आणि आरबीआय लिहिलेल्या पट्टीद्वारे (RBI strip) खऱ्या आणि खोट्या नोटा ओळखता येतात. या नोटा छापण्यासाठी (printing) किती खर्च (cost) येतो याचा विचार आपण कधी केला आहे का? यात अनेक सुरक्षा फीचर्स असतात, मात्र हा खर्च आपल्या अंदाजापेक्षा बराच कमी आहे.

कुठे छापल्या जातात या नोटा?

नोटा छापण्यासाठी येणाऱ्या खर्चाबद्दल जाणून घेण्याआधी जाणून घेऊया की या नोटा कोण आणि कुठे छापते. भारतीय चलनी नोटा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे फक्त सरकारी छापखान्यातच छापल्या जातात. देशात असे चार छापखाने आहेत. नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी (पश्चिम बंगाल). यासाठी एका खास शाईचा वापर केला जातो जिचे उत्पादन स्वित्झर्लंडची एक कंपनी करते आणि वेगवेगळी शाई वेगवेगळे काम करते. याचा कागदही खास पद्धतीने तयार केला जातो.

2000च्या नोटा छापण्यासाठी किती येतो खर्च?

2000च्या नोटा छापल्यामुळे 2018-19मध्ये खर्च बराच कमी झाला होता. याच्या आधी एक वर्ष 2017-18मध्ये हा खर्च जास्त होता आणि आता पुन्हा कमी झाला आहे. जर एका नोटेच्या हिशोबाने बोलायचे झाले तर नोट छापण्यासाठी 18.4 पैसे कमी तर 2019मध्ये 65 पैसे कमी खर्च आला आहे. 2018मध्ये 2000ची नोट छापण्यासाठी 4 रुपये 18 पैसे खर्च आला होता तर 2019मध्ये यासाठी 3.53 रुपये खर्च झाले होते. याचा अर्थ 2000च्या नोटा छापण्याचा खर्च 3-4 रुपये इतकाच येतो.

इतर नोटांची काय आहे स्थिती?

इतर चलनी नोटांबद्दल बोलायचे झाले तर 500 रुपयांची नोट छापण्यासाठी 2.13 रुपयांचा खर्च येतो. तर 200च्या नोटा छापण्यासाठी 2.15 रुपये खर्च होतात. छापखान्याच्या आधारे यात हलका फरक पडू शकतो. 2018च्या डेटानुसार 10 रुपयांच्या नोटा छापण्यास 1.01 रुपये, 20च्या नोटांसाठी 1 रुपया, 50च्या नोटा छापण्यासाठी 1.01 रुपये आणि 100 रुपयांची नोट छापण्यासाठी 1.51 रुपयांचा खर्च येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी