बँकांचे दिवाळे निघाल्यावर तुम्हांला मिळणार इतके रुपये, बजेटमध्ये मोठी घोषणा 

Budget 2020 Announcement:बँकांचे दिवाळे निघाल्यावर ग्राहकांचे ५ लाख रुपये सुरक्षित असणार आहे, अशी घोषणा २०२० च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. 

5 lakh rupees insured if bank go bankrupt budget 2020 announcement business news in marathi tbus 21
बँकांचे दिवाळे निघाल्यावर तुम्हांला मिळणार इतके रुपये, बजेटमध्ये मोठी घोषणा  

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपले २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली आहे. बँकांमधील १ लाख ते ५ लाख रुपयांच्या ठेवींना विम्याचा संरक्षण असणार आहे. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, अनुसूचित वाणिज्य बँकांच्या सर्व जमाकर्त्यांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. सीतारामन यांनी सांगितले की सर्व वाणिज्य बँकाच्या  स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी एक यंत्रणा आहे. 

यामुळे जर करदात्याचे दिवाळे निघाले, तर प्रती खाताधारकाची ५ लाख रुपयांपर्यंतची ठेवीचा विमा काढण्यात येणार आहे. वर्तमानात बँकेत जमा करण्यात येतो पण त्याची संख्या खूप कमी आहे. डिपॉजिट इंश्योरेंस एंड क्रेडिट गारंटी कॉरपोरेशन (DICGC) कायद्यातंर्गत बँकेत जमाकर्त्याची मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम अधिकाधिक १ लाख रुपयांपर्यंत वीमा केला जातो. 

१ लाख रुपयांची सीमा ही १९९३ मध्ये निश्चित करण्यात आली होती. जर ग्राहकाकडे एकापेक्षा अधिक बँकेत खाते आहेत. तर जमा विमा क्षमता प्रत्येक बँकेत जमा राशीवर वेगवेगळा लागू होणार आहे. 

DICGC कडून  विमा रक्कमेची सध्याची मर्यादा 

एक बँकेत प्रत्येक खातेदारला त्याच्या एकूण जमा रक्कमेपैकी केवळ १ लाखापर्यंतच्या रक्कमेवर विमा देण्यात आला आहे. बँक लायसन्स रद्द केल्यावर ही रक्कम द्यावी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...