इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत ५ टक्क्यांनी वाढ

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. या मुदतवाढीमुळे २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली.

5 per cent more income tax returns filed this year
इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत ५ टक्क्यांनी वाढ 

थोडं पण कामाचं

  • इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत ५ टक्क्यांनी वाढ
  • २०१९-२०चे वैयक्तिक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत १० जानेवारी २०२१ रोजी संपली
  • कंपन्यांना २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत

नवी दिल्ली: कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. या मुदतवाढीमुळे २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. भारतात २०१८-१९ मध्ये ५ कोटी ६७ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले होते. या तुलनेत २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या १० जानेवारी २०२१ पर्यंत ५ कोटी ९५ लाखांपेक्षा झाली. इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत ५ टक्क्यांनी वाढ झाली. (5 per cent more income tax returns filed this year)

भारत सरकारने २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. सरकारी आदेशानुसार २०१९-२०चे वैयक्तिक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत १० जानेवारी २०२१ रोजी संपली. पण कंपन्यांना २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

देशाचे २०२१-२२चे बजेट (अर्थसंकल्प) १ फेब्रुवारी २०२१ रोजी लोकसभेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. यात २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांबाबतची जानेवारी महिन्यापर्यंतची आकडेवारी सादर होण्याची शक्यता आहे.

इन्कम टॅक्स विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांमध्ये कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे पण वैयक्तिक रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे झालेले आर्थिक नुकसान हे या मागचे मोठे कारण आहे. रिटर्न सादर करणारे ५० लाखांपेक्षा कमी वैयक्तिक उत्पन्न असल्यास आयटीआर फॉर्म १ भरतात. हा फॉर्म भरुन २०१९-२०चे इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणारे २ कोटी ९९ लाखांपेक्षा जास्त आहेत. याउलट आयटीआर फॉर्म १ भरुन २०१८-१९चे इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणाऱ्यांची संख्या ३ कोटी ११ लाख कोटी होती. 

आयटीआर फॉर्म ४ द्वारे १० जानेवारीपर्यंत १.४९ कोटी जणांनी रिटर्न सादर केले. या उलट आयटीआर फॉर्म ४ द्वारे २०१८-१९चे इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणाऱ्यांची संख्या १.२९ कोटी होती. आयटीआर फॉर्म २ द्वारे १० जानेवारीपर्यंत ४६.१२ लाख, आयटीआर फॉर्म ५ द्वारे १० जानेवारीपर्यंत १०.५० लाख, आयटीआर फॉर्म ६ द्वारे १० जानेवारीपर्यंत ४.७२ लाख, आयटीआर फॉर्म ७ द्वारे १० जानेवारीपर्यंत १.४६ लाख जणांनी रिटर्न सादर केले.

हिंदू अविभाजीत कुटुंबाचे सदस्य असलेले तसेच एलएलपी नसलेल्या फर्म यांना ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी आयटीआर फॉर्म ४ द्वारे रिटर्न सादर करावे लागते. आयटीआर ६ व्यावसायिकांसाठी तर आयटीआर २ निवासी संपत्तीसाठी सादर करावा लागतो. आयटीआर ५ एलएलपी आणि असोसिएशन ऑफ पर्सन यांच्यासाठी आहे. ज्यांना ट्रस्ट अथवा अन्य कायदेशीर जबाबदाऱ्यांमुळे जास्त उत्पन्न मिळते त्यांनाच आयटीआर ७ द्वारे रिटर्न सादर करावे लागते. इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येतील वाढ बघता १५ फेब्रुवारीपर्यंत आणखी मोठ्या प्रमाणावर रिटर्न सादर होण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय अर्थ मंत्रालय करांबाबतच्या धोरणात यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने धोरणात्मक बदल करण्याची शक्यता आहे. करांच्या धोरणात बदल करुन महसूल वाढावा यासाठी अर्थ मंत्रालय प्रयत्न करत आहे. सरकारी महसूल वाढवणे आणि अर्थचक्राला गती देण्यासाठी बाजारात जास्तीत जास्त पैसा उपलब्ध करणे, हे करतानाच महागाई मर्यादेपलिकडे वाढू नये याची खबरदारी अर्थमंत्र्यांना घ्यायची आहे. कोरोना संकटानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ही कसरत कशी करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी