Credit card payment | क्रेडिट कार्डांच्या बिलांची डोकेदुखी दूर करायचीय...बिले भरण्याचे ५ स्मार्ट उपाय

Credit card | सणासुदीच्या काळात अनेक ऑफर्सदेखील मिळत असतात. त्यामुळे या काळात मोठी खरेदी केली जाते. शिवाय तुम्ही जर क्रेडिट कार्ड (Credit card) वापरत असाल तर त्यावर अनेक सवलती आणि सूट दिल्या जातात. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त शॉपिंग (Shopping) केली जाते. अनेकवेळा आपल्या बजेटपेक्षाही जास्त खरेदी क्रेडिट कार्डच्या सुविधेमुळे केली जाते. मात्र त्यानंतर क्रेडिट कार्डची बिले (Credit card bill) भरताना नाकी नऊ येतात.

Credit card bill payment
क्रेडिट कार्डचे बिल भरायचे स्मार्ट मार्ग 
थोडं पण कामाचं
  • सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर करून मोठी खरेदी केली जाते
  • क्रेडिट कार्ड मिळणारी ऑफर, सूट यामुळे अनावश्यक खरेदी होते
  • क्रेडिट कार्डच्या बिलांचा भरणा करण्याच्या ५ स्मार्ट पद्धती

Credit card | नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात (Festive season)अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. शिवाय या काळात अनेक ऑफर्सदेखील मिळत असतात. त्यामुळे या काळात मोठी खरेदी केली जाते. शिवाय तुम्ही जर क्रेडिट कार्ड (Credit card) वापरत असाल तर त्यावर अनेक सवलती आणि सूट दिल्या जातात. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त शॉपिंग (Shopping) केली जाते. अनेकवेळा आपल्या बजेटपेक्षाही जास्त खरेदी क्रेडिट कार्डच्या सुविधेमुळे केली जाते. मात्र त्यानंतर क्रेडिट कार्डची बिले (Credit card bill) भरताना नाकी नऊ येतात. कारण जर ही बिले लवकर भरली गेली नाहीत तर तुम्ही क्रेडिट कार्डांच्या कर्जाच्या ट्रॅपमध्ये अडकू शकता. या थकित बिलांची आणि त्यावरील व्याज, दंड यांची परतफेड करताना तुमचे पूर्ण आर्थिक गणित कोलमडून पडू शकते. क्रेडिट कार्डची बिले भरण्याचे (Smart ways to pay credit card bill)स्मार्ट मार्ग पाहूया. (Credit card payment: 5 Smart ways to get rid of credit card bills)

१. क्रेडिट कार्डच्या बिलाचे चक्र सांभाळा

क्रेडिट कार्डच्या बिलांचे स्टेटमेंट दरमहिन्याच्या ८, १८ आणि २८ अशा तारखांना तयार होतात. त्यामुळे तुम्ही महिन्यात जेव्हा खर्च कराल तेव्हा सर्वात आधी येणाऱ्या स्टेटमेंट सायकलच्या वेळेस बिल भरा. म्हणजेच या तारखांच्या आधी तुम्ही खर्च केला असेल तर ही तारीख येण्याच्या आधी बिल भरल्यास तुम्हाला व्याजमुक्त क्रेडिटचा वापर करता येईल. बिलाचे चक्र समजल्याने तुम्हाला बिल भरताना अडचण येणार नाही आणि क्रेडिटचा खऱ्या अर्थाने वापर करता येईल.

२. ज्या क्रेडिट कार्डचे बिल कमी आहे ते आधी फेडा

अनेकवेळा एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरली जातात. अशावेळी त्या क्रेडिट कार्डच्या बिलाची रक्कम भरा ज्याचे बिल सर्वात कमी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बिलांकडे वळा. सर्वात कमी क्रेडिट कार्ड बिलाचा भरणा केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा होईल आणि क्रेडिटचे रेशोदेखील चांगले होईल. 

३. बॅलन्स ट्रान्सफरचा विचार करा

तुमच्या थकित बिलांना तुम्ही एकाच कार्डवर ट्रान्सफर करू शकता. कारण यामुळे तुम्हाला नवीन कार्डद्वारे अतिरिक्त दिवसांचा क्रेडिट फ्री कालावधी मिळेल. यामुळे सुरूवातीला तुमचे व्याज वाचेल. मात्र लक्षात ठेवा नियोजित कालावधीनंतर क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्याकडून व्याजाची आकारणी करेल.

४. मोठ्या बिलांचे रुपांतर ईएमआयमध्ये करा

अनेकवेळा क्रेडिट कार्डच्या बिलाची रक्कम मोठी असल्यामुळे परतफेड करणे अशक्य होते. अशावेळी तुम्ही थकित रकमेचे रुपांतर ईएमआयमध्ये करू शकता. बहुतांश कंपन्या तुम्हाला ही सुविधा देतात. यामुळे व्याज आणि दंडाची आकारणी टाळता येते. शिवाय क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम टाळता येतो. अर्थात ईएमआयमध्ये रुपांतर करताना व्याजाबद्दल माहिती करून घ्या.

५. पूर्ण बिल भरेपर्यत क्रेडिट कार्ड वापर टाळा

जोपर्यत तुम्ही आपल्या आधीच्या क्रेडिट कार्ड बिलाची पूर्णपणे परतफेड करत नाही तोपर्यत त्या क्रेडिट कार्डचा वापर करू नका. यामुळे तुमचा अनावश्यक खर्च टाळला जाईल. शिवाय आधीच्या थकित बिलाबरोबर नव्या बिलाची भर पडल्याने तुमचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून जाईल. तुम्हाला पूर्ण बिल जमा करणे अशक्य होऊन बसेल परिणामी आधीच्या बिलावरील व्याजाबरोबरच तुम्हाला नव्या नवीन रकमेवरदेखील व्याज भरावे लागेल. यातून थकित बिलाची रक्कम वाढतच जाईल आणि तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकाल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी