६५० महिलांनी स्थापन केली बटाट्याचे चिप्स तयार करणारी कंपनी, शेअर होल्डर्स आणि डायरेक्टर्स पण महिला

650 women formed potato chips company in Firozabad Uttar Pradesh Shareholders and Directors All women : उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद मधील शिकोहाबाद येथे ६५० महिलांनी एकत्र येऊन बटाट्याचे चिप्स तयार करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीचे सर्व शेअर होल्डर्स आणि डायरेक्टर्स पण महिला आहेत.

650 women formed potato chips company in Firozabad Uttar Pradesh Shareholders and Directors All women
६५० महिलांनी स्थापन केली बटाट्याचे चिप्स तयार करणारी कंपनी, शेअर होल्डर्स आणि डायरेक्टर्स पण महिला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ६५० महिलांनी स्थापन केली बटाट्याचे चिप्स तयार करणारी कंपनी
  • शेअर होल्डर्स आणि डायरेक्टर्स पण महिला
  • उत्पादन आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या तोडीचे

650 women formed potato chips company in Firozabad Uttar Pradesh Shareholders and Directors All women : फिरोजाबाद : उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद मधील शिकोहाबाद येथे ६५० महिलांनी एकत्र येऊन बटाट्याचे चिप्स तयार करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीचे सर्व शेअर होल्डर्स आणि डायरेक्टर्स पण महिला आहेत. 'आर्क चिप्स' असे या कंपनीचे नाव आहे. स्थानिक पातळीवर बटाट्याचे चिप्स तयार करणारी कंपनी नव्हती हे पाहून महिलांनी संघटित होऊन 'आर्क चिप्स' ही कंपनी स्थापन केली. 

'आर्क चिप्स' या कंपनीवर दहा महिला डायरेक्टर्स आणि ६५० महिला शेअर होल्डर्स आहेत. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेचा लाभ घेत महिलांनी 'आर्क चिप्स' ही कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे कंपनीत गुंतवणूकदार असलेल्या तसेच बटाट्याच्या चिप्स तयार करणाऱ्या महिलांपैकी अनेकींचे शालेय शिक्षण पण झालेले नाही. पण योग्य प्रशिक्षण आणि प्रामाणिक कष्ट यांच्या जोरावर त्यांनी कंपनीचा मोठा डोलारा उभा केला आहे. 

मागच्या वर्षी ऐन कोरोना संकटात कारखाना उभा करण्यासाठी प्रत्येक महिलेने तीन हजार रुपयांचे योगदान दिले होते. या व्यतिरिक्त संचालिकांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. या पैशांतून कारखाना उभारण्यात आला. या कारखान्यातून बटाट्याच्या चिप्सचे पहिले पाकीट नोव्हेंबर २०२१ मध्ये तयार झाले. यानंतर आतापर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त बटाट्यांची पाकिटे कंपनीने तयार केली आहेत. आधी जे महिलांवर हसत होते तेच आता त्यांचा आदर करू लागले आहेत. 'आर्क चिप्स'शी संबंधित महिलांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली आहे. 

आमच्या बटाट्याच्या चिप्सची चव अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या तोडीची असल्याचे 'आर्क चिप्स' कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले. पॅकिंग, चव आणि गुणवत्तेच्या बाबतीत 'आर्क चिप्स'चे उत्पादन आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या तोडीचे आहे, असेही व्यवस्थापनाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी