Earness Allowance Of Employees | नवी दिल्ली : २०२२ च्या नवीन वर्षामध्ये सरकारी कर्मचारी (Haryana Government Employees Pensioner) आणि पेन्शनधारकांना नवीन भेटवस्तू मिळण्याची प्रक्रिया सुरूच आहे. उत्तरप्रदेश आणि ओडिशा नंतर आता हरियाणातील सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारने कर्मचार्यांच्या DA-DR मध्ये ३% ने वाढ केली आहे, त्यामुळे केंद्रातील कर्मचार्यांचा महागाई भत्ता DA/DR ने वाढून २८ वरून ३१% पर्यंत वाढला आहे. (7th pay commission 3% hike in inflation allowance will salary hike in February).
केंद्रातील मोदी सरकारच्या पाऊलांवर पाऊल टाकत हरियाणा सरकारने (Haryana Government) कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowances) आणि महागाई सवलत यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ३१५ वर पोहोचला आहे. त्यामुळे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा पगारात मोठी वाढ होणार आहे. तर नवीन पेन्शन योजनेच्या योगदानातही ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे सरकारच्या या निर्णयाचा फायदा २.८५ लाख कर्मचाऱ्यांना आणि २.६२ लाख पगारदारांना होणार आहे.
याशिवाय हरियाणा सरकारने एक मोठी घोषणा करत १ जानेवारी २०२२ पासून नवीन पेन्शन योजनेंतर्गत आपल्या कर्मचार्यांसाठी नियोक्ता योगदानात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे एकूण योगदान १० टक्क्यांवरून आता १४ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना २५ कोटी महिन्याला आणि ३०० कोटी वर्षाला लाभ मिळणार आहे, जो १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात २० हजारांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.