7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मिळणार बंपर वाढीसह पगार! जाणून घ्या संपूर्ण गणित

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 23, 2021 | 14:41 IST

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ(Increase in salary) होणार आहे. 28% डीए वाढीनंतर पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (dearness allowance) 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

7th Pay Commission: Central employees to get salary with bumper increase by end of November! Learn the whole math
नोव्हेंबर महिन्याला कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस पगार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (dearness allowance) 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.
  • आधी डीए हा 28 टक्के होता.
  • नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरघोस पगार

7th Pay Commission: नवी दिल्ली :  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ(Increase in salary) होणार आहे. , 28% डीए वाढीनंतर पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (dearness allowance) 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालया(Finance Ministry)नुसार, ऑक्टोबरपासून कर्मचारऱ्यांना 3 टक्क्यांनी वाढलेल्या डीएसह एकूण 31 टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याने नोव्हेंबर महिन्याला पगार वाढून मिळणार आहे. दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 17 टक्क्यांनी वाढ करत 28 टक्के केले आहे. त्यानंतर डीएमध्ये अजून वाढ करत एकूण डीए 31 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.  

31 टक्के झाला महागाई भत्ता 

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्के झाला आहे. याच्या आधी महागाई भत्ता 28 टक्के होता. आता कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याची सॅलरीमध्ये बंफर वाढ होणार आहे. या महिन्याच्या अखेरी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार 3 टक्क्यांनी वाढलेल्या डीएसह येणार आहे. चला तर जाणून घेऊ 28 टक्के डीएच्या तुलनेत 31 टक्के डीएसह कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार आहे?

31 टक्क्यांनी वाढलेल्या डीएचं गणित

तीन टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर डीएमध्ये एकूण 31 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता 18 हजार रुपये बेसिक वेतनावर वर्षाचा महागाई भत्ता 66 हजार 960 रुपये होईल. तर वेतनाविषयी म्हणाल तर वार्षिक पगारात 6,480 नी वाढ होईल. 

किमान मूळ पगाराचं गणित         

कर्मचारीची बेसिक सॅलरी 18,000 रुपये
नवीन महागाई भत्ता   (31%) 5580 रुपये/दरमहा
आता पर्यंतचा  महागाई भत्ता (28%) 5040 रुपये/दरमहा
किती महागाई भत्ता वाढला 5580- 5040 = 540 रुपये/दरमहा
वार्षिक वेतनात झालेली वाढ 540X12= 6,480 रुपये


अधिकच्या मूळ पगाराचं गणित
 

कर्मचारीची बेसिक सॅलरी   56900 रुपये
नवीन महागाई भत्ता (31%) 17639 रुपये /दरमहा
आतापर्यतचा महागाई भत्ता (28%) 15932 रुपये/दरमहा
किती वाढला  महागाई भत्ता  17639-15932= 1,707 रुपये/दरमहा
वर्षाच्या पगारातील झालेली वाढ 1,707 X12= 20,484 रुपये

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी