7th Pay Commission : Central Government Employees May Get 4 Percent DA Hike on This Day : सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होणार आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर या पगारवाढीचा फायदा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर मार्च महिन्यात निर्णय होणार असल्याचे वृत्त आहे. मार्च महिन्यातील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे समजते. । काम-धंदा
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (Dearness allowance - DA / महागाई भत्ता) तसेच निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पेन्शन (Pension / निवृत्ती वेतन) यात वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना संकटाचा काळ वगळता एरवी केंद्र सरकार डीए आणि पेन्शनवाढीबाबतचे निर्णय अनेकदा होळीच्या आधी घेते. यामुळे 1 मार्च 2023 रोजी होणार असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल असा अंदाज आहे. अपेक्षेप्रमाणे निर्णय झाला तर डीए, पेन्शनवाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
महागाईची स्थिती बघता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांची वाढ होईल आणि निवृत्ती केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
महागाई वाढत असल्यास डीए वाढतो. या निकषामुळे डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. किरकोळ महागाई सध्या 4.23 टक्के आहे. सरकारी पातळीवर डीए वाढवताना अनेकदा दशांश संख्येचा विचार होत नाही. यामुळे डीए 4 टक्के वाढेल असा अंदाज केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्के आहे. जर 4 टक्क्यांची वाढ झाली तर डीए 42 टक्के होणार आहे.
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन सध्या 18 हजार रुपये प्रति महिना असेल, तर 38 टक्के डीए नुसार त्याला 6840 रुपये डीए मिळेल. डीए 4 टक्के वाढला तर 18 हजार प्रति महिना पगारावर 42 टक्क्यांप्रमाणे 7560 रुपये डीए मिळेल.