7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, लवकरच वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता

केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता किंवा डीए देण्याची शक्यता आहे. १ जुलै २०२१ पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स (dearness allowance)(DA)मिळण्याची शक्यता आहे.

Central government employees to get DA from July
जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए मिळण्याची शक्यता 

थोडं पण कामाचं

  • जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीए मिळण्याची शक्यता
  • इंडेक्सेशनवर अवलंबून आहे डीएमधील वाढ
  • कोरोनामुळे महागाई भत्ता मिळाला नव्हता

नवी दिल्ली : केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता किंवा डीए देण्याची शक्यता आहे. १ जुलै २०२१ पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (central government employees) महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स (dearness allowance)(DA)मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा महागाई भत्ता १ जुलैपासून पुढे लागू होणार आहे. मागील वर्षापासून किंवा या वर्षाच्या सुरूवातीपासून वाढीव डीए (hikes in DA)लागू केला जाणार नाही. त्यामुळे २०२०च्या सुरूवातीपासून वाढीव डीए लागू केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकी ( arrears)मिळू शकते. मात्र महागाई भत्ता जुलै महिन्यापासूनच लागू केला जाण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांना थकबाकी देखील मिळणार नाही, (prospectively, rather than retrospectively with arrears)अशी शक्यता आहे. (Central government employees to get DA from July 1, 2021 prospectively)

इंडेक्सेशनवर अवलंबून आहे डीएमधील वाढ

महागाई निर्देशांकाशी संबंधित निकष (cost indexation) आणि त्याच्या आधारावर देण्यात येणारा महागाई भत्ता (DA increase) याची निश्चिती ३० जूनला होणार असून महागाई भत्त्यात जवळपास २८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, असे अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून समोर आले आहे. महागाई भत्त्याच्या निर्देशांकाच्या निकषावर म्हणजेच इंडेक्सेशनवर बरेच काही अवलंबून असणार आहे. महागाई भत्ता मागील वर्षापासून किंवा मागील कालावधीपासून वाढवता येत नाही, अशी माहिती पुढे अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

कोरोनामुळे महागाई भत्ता मिळाला नव्हता

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या १७ टक्के इतका महागाई भत्ता मिळतो आहे. हा महागाई भत्ता जुलै २०१९मध्ये लागू झाला होता. त्यानंतर जानेवारी २०२०मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ अपेक्षित होती. मात्र कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी २०२० मध्ये वाढ झाली नव्हती. सरकारने डीएमधील वाढ रोखून धरली होती. शिवाय १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२० या तीन कालावधीसाठीचा महागाई भत्ता सरकारकडून गोठवण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात आला नव्हता. महागाई भत्ता मिळावा यासाठी कर्मचारी संघटना आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्यात मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.

लाखो कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

महागाई भत्त्याशी निगडीत अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाचा परिणाम लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांवर होणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यातील वाढ ही मागील कालावधीपासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह आधारावर लागू करेल अशी अपेक्षा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना आहे. महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या वेतन आणि पेन्शनमधील महत्त्वाचा हिस्सा असतो. महागाई भत्त्यातील वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात किंवा पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. २८ टक्के वाढ डीएमध्ये मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात घवघवीत वाढ होणार आहे. मात्र आता केंद्र सरकार महागाई भत्त्यातील वाढ जुलै २०२१पासून पुढे लागू करते किंवा त्या आधीच्या कालावधीपासून हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील कालावधीपासून वाढीव डीए लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए वाढल्याचा फायदा सध्याच्या वेतनात तर होणारच आहे, शिवाय ज्या दिवसापासून वाढीव डीए लागू होईल तेव्हापासून आतापर्यतची थकबाकीदेखील मिळेल. हीसुद्धा एक चांगली रक्कम असणार आहे. त्यामुळेच लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मागील कालावधीपासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह आधारावर महागाई भत्ता लागू करावा अशी अपेक्षा आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी