७वा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूष खबर, मिळणार थकलेला आणि वाढीव डीए, १ जुलैपासून अंमलबजावणी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनर्सचे तीन डीए इन्स्टॉलमेंट थकवले होते.

7th Pay Commission: Central governments DA wiil be restored
केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार वाढीव डीए  

थोडं पण कामाचं

  • कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना सरकारचा मोठा दिलासा
  • मिळणार डीए भत्त्याचे थकलेले तीन इन्स्टॉलमेंट
  • नवा वाढीव डीए भत्ता होणार लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचा डीए भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२१ पासून हा निर्णय लागू होणार आहे. डीए भत्त्याचे (डिअरनेस अलाऊन्स) थकलेले तीन इन्स्टॉलमेंट १ जुलै २०२१ पासून दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली आहे.

राज्यसभेत अनुराग ठाकूर यांचे उत्तर

राज्यसभेतील डीए भत्त्यासंदर्भातील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे डीए भत्त्याचे थकलेले तीन हफ्ते दिले जाणार असून नवे सुधारित डीए भत्ता १ जुलै २०२१पासून लागू केला जाणार आहे. 

जुलै महिन्यापासून लागू होणार निर्णय

१ जुलै २०२१पासून नवे डीए भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून डीए भत्त्याचे  १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१पासूनचे दर कायम केले जाणार आहेत. नव्याने देण्यात येत असेलेले डीए भत्त्याचे दर हे १ जुलै २०२१पासून लागू केले जाणार आहेत. 

कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

सध्या केंद्र सरकारच्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनर्सना १७ टक्के डीए भत्ता दिला जातो आहे. यात भरघोस वाढ होत तो २८ टक्क्यांपर्यत पोचू शकतो. यात १ जानेवारी २०२०पासून लागू करण्यात आलेली ३ टक्के वाढदेखील समाविष्ट असेल. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या हाती येणाऱ्या वेतनात चांगलीच वाढ होणार आहे. डीए भत्ता पुन्हा लागू केल्याने केंद्र सरकारच्या ६५ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजेच पेन्शनर्सना आणि ५२ लाख कार्यरत कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. डीए भत्ता लागू झाल्यानंतर पेन्शनर्ससाठीचा डीए भत्तादेखील लागू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. १ जुलै २०२१पासून हा निर्णय लागू होणार आहे. 

डीए भत्त्यातील वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या हाती येणाऱ्या वेतनात कशी होणार वाढ

सरकारच्या एकूण वेतनामध्ये बेसिक वेतन, डीए भत्ता, हाऊस रेंट अलाऊंस (एचआरए), टीए (ट्रॅव्हल अलाऊंस), मेडिकल अलाऊंस इत्यादींचा समावेश असतो. केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा डीए सध्याच्या १७ टक्क्यांवरून वाढून २८ टक्क्यांवर जाणार असल्यामुळे ज्या कर्मचाऱ्याचे बेसिक वेतन १८,००० रुपये असेल त्याच्या डीए भत्त्यात वाढ होत तो ३,०६० रुपये प्रति माह वरून ५,०४० रुपये प्रति माहवर पोचणार आहे. या प्रस्तावित डीए भत्त्यातील वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युईटीमधील कॉन्ट्रिब्युशनमध्ये देखील वाढ होणार आहे. कारण ईपीएफ आणि ग्रॅच्युईटीची रक्कम काढताना बेसिक वेतन अधिक डीएचा समावेश केलेला असतो.

कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच नागरिकांसमोर आव्हान उभे केलेले आहे. अशातच डीए संदर्भातील निर्णय घेऊन केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठाच दिलासा दिला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी