7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, ३१ मार्च 2022 पर्यत मिळणार स्वस्तात गृहकर्ज

House Building Advance : सरकार कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देते आहे. ३१ मार्च २०२२ पर्यत जर कर्मचाऱ्यांनी ही रक्कम किंवा कर्ज घेतले तर फक्त ७.९ टक्के व्याजदराने कर्ज.

House Building Advance
सरकारी कर्मचाऱ्यांना स्वस्तात गृहकर्ज 

थोडं पण कामाचं

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स
  • कुठे मिळतो हा हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स
  • साध्या व्याजदराने मिळते गृहकर्ज

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या (Corona pandemic) काळात स्वस्तात होम लोन (cheap home loan) घेण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे. सरकार कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने गृहकर्ज (home loan with low interest rate)उपलब्ध करून देते आहे. ३१ मार्च २०२२ पर्यत जर कर्मचाऱ्यांनी ही रक्कम किंवा कर्ज घेतले तर फक्त ७.९ टक्के व्याजदराने (House Building Advance) ही रक्कम मिळणार आहे. मागील आर्थिक वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी गृहनिर्माण क्षेत्र आणि निर्यात क्षेत्र यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्येच गृहकर्जाचे व्याजदर घटवण्याचाही समावेश होता. आता याची मुदत ३१ मार्च २०२२पर्यत वाढवण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी (Central & State employees) दोन्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (Government Employees to get House Building Advance till 31 March 2020)

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स

केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांना सरकार हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स म्हणजेच स्वस्तातील गृहकर्ज देते. यामध्ये कर्मचारी स्वत: किंवा आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी अॅडव्हान्स घेऊ शकतात. अॅहव्हान्स बॅंक लोन रिपेमेंटमेंट म्हणजे बॅंकेच्या कर्जाच्या परतफेडीच्या आधारावर दिला जातो. कर्मचाऱ्यांना हा निधी घर विकत घेण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी मिळतो. मात्र यासाठी अटी असतात. नोकरीत असताना कर्मचाऱ्यांना एकदाच हा अॅडव्हान्स मिळतो. सर्व पर्मनंट कर्मचारी या हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्ससाठी पात्र असतात. याशिवाय लागोपाठ ५ वर्षे सेवेत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनादेखील या सुविधेचा लाभ मिळतो.

कुठे मिळतो हा हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स (How to get House Building Advance)

या अॅडव्हान्ससाठी कर्मचाऱ्यांना आपल्या विभागाकडे अर्ज करावा लागतो. सरकार सध्या या योजनेवर वेगाने कारवाई करते आहे. घर विकत घेण्यासाठी आवश्यक रक्कम एका स्पेशल विंडोद्वारे मिळते. या विंडोमध्ये तज्ज्ञ असतात ते सहजरित्या गृहकर्ज घेण्यासाठी मदत करतात. याशिवाय सरकारकडून एक्सटर्नल कमर्शियल गाईडलाईन फॉर अफोर्डेबल हाऊसिंग लोनसाठी सुविधा देण्यात आली आहे.

साध्या व्याजदराने मिळते गृहकर्ज

हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्सचे वैशिष्ट्ये असे की ते साध्या व्याजदराने म्हणजे Simple interestने दिले जाते. यामध्ये व्याजाच्या स्लॅबनुसार गणित केले जाते. यामध्ये स्लॅबसुद्धा ५०,००० रुपयांपासून ते ७.५ लाख रुपयांपर्यत आहेत. यामध्ये कमाल ७.५ लाक रुपये मिळतात. एकूण हा अॅडव्हान्स म्हणजे हे गृहकर्ज अतिशय कमी व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते.

काय आहेत अटी

३४ महिन्यांचे बेसिक पे आणि घराची किंमत पाहून तुमचे हाऊसिंग बिल्डिंग अॅडव्हान्स किंवा गृहकर्जासाठीची फाईल पास होते. शिवाय यात कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीदेखील (Length of Service) पाहिला जातो. 

कशासाठी मिळतो हाऊसिंग बिल्डिंग अॅडव्हान्स किंवा गृहकर्ज

  1. प्लॉट किंवा घर विकत घेण्यासाठी
  2. घराच्या बांधकामासाठी
  3. सहकारी किंवा ग्रुप हाऊसिंग सोसायटीमध्ये प्लॉट विकत घेण्यासाठी
  4. सेल्फ फायनान्सिंग स्कीममध्ये घर विकत घेण्यासाठी

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील वर्षी घोषणा करताना सांगितले होते की यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळेल. घरांची मागणी वाढवण्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा आणि सूट दिल्याने या क्षेत्रातील मागणी वाढेल, असे सरकारचे मत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १.९५ कोटी नागरिकांना फायदा झाला आहे. सरकार स्वस्तात घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी