7th Pay Commission, Central Employees Salary Hike: नवी दिल्ली: नवीन वर्षात (New year) केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees ) पुन्हा एकदा गोड बातमी मिळू शकते. सरकार (Government) पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना भेट देण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, डीए (Dearness allowance) वाढवण्यासोबतच सरकार एचआरएचाही (HRA) विचार करत आहे. तथापि, जानेवारी 2022 मध्ये वाढीव महागाई भत्ता (डीए वाढ) कधी जाहीर केला जाईल हे अद्याप ठरलेले नाही. या वेळीही पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास किमान मूळ वेतनातही वाढ होईल. सध्या महागाई भत्ता 31 टक्के आहे.
AICPI आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार महागाई भत्ता 32.81 टक्के करण्यात आली आहे. तर जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.यापूर्वी सरकारने दिवाळीनिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. सरकार जानेवारी २०२२ च्या सुरुवातीला एचआरए वाढविण्याचा विचार करत आहे. नवीन वर्षात सरकार HRA बाबत घोषणाही करू शकते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता आणि महागाई सवलत वर्षातून दोनदा वाढवली जाते. हे सहामाही आधारावर मोजले जाते. 2022 च्या पहिल्या सहामाहीत डीए वाढल्यानंतर पगार वाढेल.
सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे. अर्थ मंत्रालय 11.56 लाखांहून अधिक कर्मचार्यांचा घरभाडे भत्ता (HRA) लागू करण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२१ मध्ये एचआरए मिळेल.
फायन्सास एक्सपर्ट्सच्या मतानुसार, आता कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी किंवा मूळ वेतन 18000 रुपयांपासून ते 57000 रुपयांपर्यंत आहे. या हिशोबाने 18000 रुपये सॅलरी असलेले कर्मचाऱ्यांचा पगार वाढून 30240 रुपये होणार आहे. यासह ज्यांचा पगार आता 56900 रुपये आहे, त्यांचा पगार 2,11,668 रुपये इतका होणार आहे.