7th pay commission | महागाई भत्त्यातील वाढीबरोबर या कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ७,५०० रुपयांची वाढ

7th pay commission | महागाई भत्त्यातील ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार करण्यात आली आहे. महागाई भत्त्याची रक्कम एआयसीपीआय पाहून निश्चित केली जाते. रेल्वे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या थकबाकीचादेखील लाभ मिळणार आहे.

DA & Salary hike
महागाई भत्ता आणि वेतनातील वाढ 
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वेच्या ११.५६ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीची आणखी एक भेट
  • महागाई भत्त्यामुळे वेतनात वाढ
  • महागाई भत्त्यातील वाढ १ जुलै २०२१पासून ही वाढ लागू

7th pay commission | नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या (Indian Railways)११.५६ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीची आणखी एक भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) (DA) ३ टक्के वाढीची घोषणा केली आहे. १ जुलै २०२१पासून ही वाढ लागू होणार आहे. आता या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून वाढून ३१ टक्के झाला आहे. म्हणजेच वेतनात ५४० रुपयांपासून ७,५०० रुपये दरमहाची वाढ (Salary Hike)होणार आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या (7th pay commission)शिफारशींनुसार करण्यात आली आहे. महागाई भत्त्याची रक्कम एआयसीपीआय पाहून निश्चित केली जाते. रेल्वे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या थकबाकीचादेखील लाभ मिळणार आहे. (7th pay commission : Indian Railways 11.56 lakhs employees will get benefit of salary hike along with DA)

किती होईल वाढ

लेव्हल १ बेसिक पे = १८,००० रुपये

३ टक्के महागाई भत्त्यातील वाढ = ५४० रुपये दरमहा

महागाई भत्त्यातील वार्षिक वाढ = ६,४८० रुपये वार्षिक

(कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या वेतनात ७,५०० रुपयांची वाढ दरमहिन्याला होणार आहे. यांचे बेसिक वेतन सर्वात जास्त म्हणजे २.५ लाख रुपये आहे.)

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा केली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस १७,९५० रुपये असणार आहे. हा ७८ दिवसांचा प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांसाठी आहे. यामध्ये आरपीएफ, आरपीएसएफ कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे बोर्ड दर वर्षी दसऱ्याच्या आसपास ७८ दिवसांचा बोनस देते. यामध्ये ३० दिवसांच्या बोनसपोटी ७,००० रुपये मिळतात. याच आधारावर ७८ दिवसांच्या बोनसची रक्कम निश्चित होते.

अद्याप जुलै २०२१चा महागाई भत्ता (DA)निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र जानेवारी ते मे २०२१च्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे की महागाई भत्त्यात ३ टक्क्यांपर्यत वाढ होऊ शकते. त्यामुळे महागाई भत्त्यात ३ टक्के आणखी वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ३१ टक्क्यांपर्यत पोचेल. प्रसार माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार दिवाळीअगोदर महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आतापर्यत महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढला आहे. सरकारने जुलै २०२१ पासून महागाई भत्ता २८ टक्के केला आहे. आता जून २०२१ पासून यात ३ टक्के वाढ होऊ शकते. असे झाल्यास महागाई भत्ता एकूण वाढींसह (१७+४+ ३+ ४+३) ३१ टक्क्यांवर पोचेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन ५०,००० रुपये असल्यास त्याला १५,५०० रुपये महागाई भत्ता मिळणार आहे.

या दिवाळीआधी ईपीएफओ ६ कोटींपेक्षा जास्त पीएफखातेधारकांना दिलासा देऊ शकते. दिवाळीआधी पीएफखातेधारकांच्या खात्यात पीएफचे व्याज जमा होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी