नवी दिल्ली: सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सप्टेंबर २०२१ पासून वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सतरा टक्के महागाई भत्ता मिळतो. सप्टेंबर २०२१ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार बत्तीस टक्के महागाई भत्ता मिळेल. तसेच जानेवारी २०२१ आणि जुलै २०२१चा वाढीव महागाई भत्ता सप्टेंबर २०२१च्या पगारातच दिला जाणार आहे. 7th pay commission latest news: When 7th CPC DA, DR benefit may resume
महागाई भत्त्याप्रमाणेच महागाई दिलासा म्हणून दिली जाणारी रक्कमही सप्टेंबर २०२१च्या पगारात दिली जाईल. जानेवारी २०२१ आणि जुलै २०२१चा वाढीव महागाई दिलासाही सप्टेंबर २०२१च्या पगारातच दिला जाणार आहे. यामुळे सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळेल.
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त झालेले केंद्रीय कर्मचारी या सर्वांना सप्टेंबर २०२१ पासून महागाई भत्ता आणि महागाई दिलासा म्हणून दिली जाणारी रक्कम हे दोन्ही भत्ते मिळणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार हा लाभ मिळेल. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त झालेले केंद्रीय कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळेल. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त झालेले केंद्रीय कर्मचारी मिळून १ कोटी १२ लाखांपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांना वाढीव पगार मिळणार आहे. ही रक्कम एकत्रितपणे सप्टेंबरमध्येच द्यावी आणि पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने द्यावी यावर मतभेद आहेत. हे मतभेद पुढील काही दिवसांत दूर केले जातील. पण सप्टेंबर २०२१ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल हे निश्चित, असे सूतोवाच केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने केले.