7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकते मोठे गिफ्ट; इतकी वाढेल सॅलरी

काम-धंदा
भरत जाधव
Updated Mar 15, 2023 | 16:16 IST

वृत्तानुसार, आजच्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government employees)  डीए वाढीची घोषणा केली जाऊ शकते. पीटीआयने या वर्षी फेब्रुवारीमध्ये अहवाल दिला होता त्यानुसार केंद्र सरकार सध्या 38% वरून 4 टक्क्यांनी वाढवून तो 42 टक्क्यांनी डीए  वाढवू शकते.

7th pay commission: Modi government can give big gifts to government employees
सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकते मोठे गिफ्ट;  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA ग्राहक किंमत निर्देशांक (CPI)च्या आधारे ठरवला जातो.
  • केंद्र सरकार सध्या 38% वरून 4 टक्क्यांनी वाढवून तो 42 टक्क्यांनी डीए वाढवू शकते.
  • महागाई भत्त्यात 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल.

7th pay commission:  आज होणाऱ्या केंद्र सरकारच्या (Central Govt) बैठकीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, आजच्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government employees)  डीए वाढीची घोषणा केली जाऊ शकते. पीटीआयने या वर्षी फेब्रुवारीमध्ये अहवाल दिला होता त्यानुसार केंद्र सरकार सध्या 38% वरून 4 टक्क्यांनी वाढवून तो 42 टक्क्यांनी डीए  वाढवू शकते.

अधिक वाचा : संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा, संपावर जाण्यास मनाई

जर सरकारने हा डीए वाढविण्याचा निर्णय झाला तर एक कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA ग्राहक किंमत निर्देशांक (CPI)च्या आधारे ठरवला जातो.

किरकोळ महागाई झाली कमी 

नवीन आकड्यानुसार फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई 6.44 टक्क्यांनी कमी झाली आहे. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमतीमध्ये साधरण घसरण झाली होती. 13 मार्चला जाहीर करण्यात आलेल्या सीपीआयच्या आधारे महागाई फेब्रुवारी 2022 मध्ये 6.52 टक्के आणि 6.07 होती. दरम्यान यावर काही निर्णय घेण्यात आला आहे. तर डीए म्हणजे महागाई भत्त्यात 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. 

अधिक वाचा : मेषसह दोन राशींना बुधवार धन लाभासाठी ठरेल लकी

38 टक्के मिळतोय डीए 

 केंद्र  सरकारने जून 2022 पर्यंत टक्वेवारी वाढवत 38 टक्के केला आहे.डीए सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो. जेणेकरुन किमतींची भरपाई केली जाईल. महागाई भत्ता वर्षातून दोनदा वेळोवेळी बदलला जातो. दरम्यान, डीए वाढीबाबत अनेक राज्यांमध्ये चर्चा चालू आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीसाठी पश्चिम बंगालचे सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी