7th Pay Commission News Today: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी दिवाळीपूर्वी देणार मोठं गिफ्ट 

7th Pay Commission : सातव्या वेतन (7th Pay Commission 2022) आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) येत्या दिवाळी पूर्वी मिळण्याची शक्यता झाली आहे. त्यामुळे यावेळची दिवाळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना गोड ठरू शकते.

7th pay commission news today in marathi good news for central employees increase in da and dr soon but when get to know
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी दिवाळीपूर्वी देणार मोठं गिफ्ट  
थोडं पण कामाचं
  • सातव्या वेतन (7th Pay Commission 2022) आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) येत्या दिवाळी पूर्वी मिळण्याची शक्यता झाली आहे.
  • यावेळची दिवाळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना गोड ठरू शकते
  • 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांच्या डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते.

7th Pay Commission News in marathi : सातव्या वेतन (7th Pay Commission 2022) आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) येत्या दिवाळी पूर्वी मिळण्याची शक्यता झाली आहे. त्यामुळे यावेळची दिवाळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना गोड ठरू शकते. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार डीए आणि डीआर वाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (7th pay commission news today in marathi good news for central employees increase in da and dr soon but when get to know)

अधिक वाचा : Viral Video : पिंजऱ्यात आलेल्या माणसावर सिंहीणीने मारली उडी आणि...

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांच्या डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते. पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये. तथापी, सरकारी कर्मचार्‍यांच्या माहितीसाठी असे की केंद्राने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंतर्गत DA आणि DR वाढीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जुलै महिन्याची वाढ अद्याप झालेली नाही. त्यासाठी पुढील महिना उजाडू शकते अशी शक्यता अधिकृत सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

महागाई भत्ता (DA) सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत (DR) दिली जाते. केंद्र 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर DA आणि DR वाढ करते आणि सामान्यतः ते मागील सहा महिन्यांच्या AICPI निर्देशांकावर अवलंबून असते.

अधिक वाचा : Snake inside locker : लॉकर उघडताच सापाने केला हल्ला, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मन करा घट्ट

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र डीए 4% वाढवण्याची शक्यता आहे. सध्या, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 34% डीए मिळत आहे जो मार्च 2022 मध्ये 3%नी वाढवण्यात आला होता. या आधी 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 31% डीए मिळत होता. अहवालांवर विश्वास ठेवला तर, जुलैसाठी डीए आणि डीआर वाढ 28 सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी