7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार  होऊ शकतो दुप्पट,  कॅल्युलेशन समजून घ्या 

7th Pay Commission latest update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चांगली बातमी मिळू शकते. नवीन वर्षात पगार वाढण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीला  केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये (Fitment Factor)वाढ होऊ शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार  होऊ शकतो दुप्पट
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार  होऊ शकतो दुप्पट 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढू शकते
  • अर्थसंकल्पाच्या मसुद्यात समाविष्ट केले जाऊ शकते
  • फिटमेंट फॅक्टर 3 पट वाढवण्यावर भर

7th Pay Commission update । नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. पहिला महागाई भत्ता Dearness allowance), नंतर HRA आणि TA प्रमोशन मिळाल्यानंतर आता नवीन वर्षात त्यांना पुन्हा मोठं गिफ्ट  मिळू शकणार आहे. (7th pay commission update central govt to increase fitment factor in 2022 budget see cpc latest news in marathi )

वास्तविक, सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ करू शकते  (CG employees salary) सूत्रांनुसार  केंद्रीय आणि राज्य कर्मचार्‍यांचे फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor)या महिन्यात वाढू शकते. फिटमेंट वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनातही  (Minimum wages) वाढ होणार आहे.

सरकार विचार करत आहे

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे की त्यांचा फिटमेंट फॅक्टर (Fitment factor news) 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवावा. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांचे फिटमेंट फॅक्टर ठरवले जाणे अपेक्षित आहे. यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही वाढ होणार आहे.

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ९५,००० रुपयांपर्यत वाढणार, पाहा कॅल्क्युलेशन

अर्थसंकल्पाच्या मसुद्यात समाविष्ट केले जाऊ शकते

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून  मंजुरी  (Cabinet approval)मिळू शकते. अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याचा समावेश अर्थसंकल्पाच्या खर्चात करता येईल. पण त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास त्याचा अर्थसंकल्प (Budget 2022) मसुद्यात समावेश करण्याची विशेष गरज नाही.


पगार किती वाढेल

फिटमेंट फॅक्टर(Central govt employee Fitment factor)मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होईल. किंबहुना, फिटमेंट फॅक्टर वाढल्याने किमान वेतनातही वाढ होईल. सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वेतन (Salary under fitment factor मिळत आहे. आता ती वाढवून 3.68 टक्के करण्याचा विचार केला जात आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात  (Minimum Salary)आठ हजार रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच आतापर्यंत मिळालेला पगार 18000 रुपयांनी वाढून 26000 रुपये होईल.

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! १८ महिन्यांच्या डीए थकबाकीवर या दिवशी निर्णय

फिटमेंट फॅक्टर 3 पट वाढवण्यावर भर

सरकारला 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशी लागू करायच्या आहेत, परंतु 7 व्या CPC अंतर्गत किमान वेतन (Minimum salary under 7th CPC)  वाढवण्याच्या बाजूने नाही. सरकार फिटमेंट फॅक्टर 3 पट वाढवू शकते. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन  (Basic Pay)18000 रुपयांवरून 21000 रुपये होणार आहे. कॅबिनेट सचिवांसोबत (Cabinet secretary)झालेल्या कर्मचारी संघटनेच्या बैठकीतही त्यांना आश्वासन मिळाले. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार आता फिटमेंट फॅक्टरवर अधिक लक्ष देत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी