मुंबई पुण्यात इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या ऑलेक्ट्राच्या निव्वळ नफ्यात या वर्षाच्या तिमाहीत  825.2% ची वाढ 

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (Olectra) या  भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने  30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत रु. 304.7 कोटींचा महसूल नोंदवला आहे

825.2% increase in net profit of Olectra, the electric bus provider in Mumbai Pune, in the quarter of this year
ऑलेक्ट्राच्या निव्वळ नफ्यात या वर्षाच्या तिमाहीत  825.2% वाढ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महसूल ६४०.४ टक्क्यांनी वाढला
  • Q1 मध्ये 169 ई-बस वितरित 
  • ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (Olectra) या  भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने  30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत रु. 304.7 कोटींचा महसूल नोंदवला आहे

मुंबई :  ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (Olectra) या  भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने  30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत रु. 304.7 कोटींचा महसूल नोंदवला आहे, जो मागच्या वर्षीच्या  तिमाहीत रु. 41.2 कोटी होता. महसुलात 640 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली  आहे. (825.2% increase in net profit of Olectra, the electric bus provider in Mumbai Pune, in the quarter of this year)

 या तिमाहीत 169 इलेक्ट्रिक बसेसच्या मागणीची पुर्तता करण्यात आली. , मागच्या वर्षीच्या तिमाहीत फक्त 11 बसेसची डिलेव्हरी होउ शकली होती. चालू तिमाहीत कंपनीच्या पुणे बस संचालनातून उत्तम  उत्पन्नाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा :  अधीररंजन चौधरींच्या 'राष्ट्रपत्नी' च्या वक्तव्यावर गदारोळ

करानंतरचा नफा 825.2 टक्क्यांनी Y-o-Y आधारावर वाढून 18.8 कोटी झाला आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीत फक्त रु.2.0 कोटी होता. EBITDA 8.7 कोटींच्या तुलनेत 322.6 टक्क्यांनी वाढून 36.8 कोटी झाला आहे. करपूर्व नफा (PBT) 799.9 टक्क्यांनी वाढून रु. 24.7 कोटी इतका झाला आहे. कंपनीने 18.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

अधिक वाचा :  नवरीच्या ड्रेसमध्ये सारा तेंडुलकरचे फोटोशूट, इंटरनेटवर खळबळ

SRTC  ऑलेक्ट्राच्या 300 EV बसेस प्रवाशी सेवेत आणणार 

बेस्ट ची २१०० इलेक्ट्रिक बसेस आणि एसटी महामंडळाकडून १०० बसेसची ऑर्डर मिळालेली असतानाच ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ला 300 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यासाठी TSRTC कडून  नवी  ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत अंदाजे 500 कोटी रुपये आहे. भारत सरकारच्या FAME-II योजनेअंतर्गत 300 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचा ही मागणी आहे. या 300 ई-बस 12 वर्षांसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC)/OPEX मॉडेलच्या आधारावर पुरवल्या जातील. EVEY या बसेस Olectra Greentech Limited ("OLECTRA") कडून खरेदी करेल,  20 महिन्यांच्या कालावधीत त्या वितरित केल्या जातील. कराराच्या कालावधीत ऑलेक्ट्रा या बसेसची देखभाल करणार आहे. 

अधिक वाचा :  हुमा कुरेशीची नेट वर्थ

सध्या, EVEY आणि Olectra Greentech Limited देशातील विविध राज्य परिवहन उपक्रम (STU) मध्ये इलेक्ट्रिक बस चालवत आहेत, पुणे (PMPML), मुंबई (BEST), गोवा, डेहराडून, सुरत, अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर इत्यादी ठिकाणी या बसेस यशस्वीरित्या कार्यरत आहेत. 

या 12-मीटर, एकमजली नॉन-एसी बसेसची आसन क्षमता 35+ व्हील चेअर आणि चालक अशी आहे. इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशन बसेसमध्ये आहे.  सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक आसनासाठी एक आपत्कालीन बटण आणि यूएसबी सॉकेट्स आहेत. बसमधील लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी रहदारी आणि प्रवासी लोड यावर आधारित 80% SOC वर एका चार्जवर सुमारे 200 किमी प्रवास करू शकते.  रिजनरेटिव्ह ब्रेकींग सिस्टम या बसमध्ये आहे.  तसेच  हाय-पॉवर डीसी चार्जिंग सिस्टम 5 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण बॅटरी चार्ज करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी