Aadhaar Card Update:आधार कार्ड युजर्स फोन नंबर, पत्ता, जन्मतारीख या सोप्या स्टेप्ससह बदलू शकतात ऑनलाइन

Aadhaar Card Update:आधार कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी, युजर्सला कोणत्याही आधार केंद्राला भेट देण्याची गरज नाही. UIDAI ने अलीकडेच युजर्सला त्यांचा आधार-लिंक केलेला मोबाईल नंबर घरबसल्याच अपडेट करण्याची परवानगी दिली आहे.

aadhaar card update users can change phone number address date of birth photo with these simple steps online
आधारकार्डावरील बदल करा ऑनलाइन घरबसल्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आजच्या डिजिटल युगात, आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे केवळ ओळखीचा पुरावा म्हणून काम करत नाही तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत करते.
 • धार हा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केलेला 12-अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक आहे.
 • . या कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, बायोमेट्रिक डेटा, छायाचित्र आणि पत्ता इत्यादी माहिती असते.

Aadhaar Card Update: आजच्या डिजिटल युगात, आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे केवळ ओळखीचा पुरावा म्हणून काम करत नाही तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत करते. विशेष म्हणजे, आधार हा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केलेला 12-अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक आहे. या कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, बायोमेट्रिक डेटा, छायाचित्र आणि पत्ता इत्यादी माहिती असते. (aadhaar card update users can change phone number address date of birth photo with these simple steps online)

जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये स्पेलिंग एरर, वैयक्तिक तपशील त्रुटी किंवा चुकीचा मोबाइल नंबर यासारखी कोणतीही समस्या आढळल्यास तुम्ही नवीन मोबाइल नंबर आणि इतर तपशीलांसह ते ऑनलाइन अपडेट करू शकता. या सेवांसाठी, तुम्हाला कोणत्याही आधार केंद्राला भेट देण्याची गरज नाही. UIDAI ने अलीकडेच युजर्सला त्यांचा आधार-लिंक केलेला मोबाईल नंबर घरबसल्याच अपडेट करण्याची परवानगी दिली आहे.

आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update): फोन नंबर कसा अपडेट करायचा ते खाली पाहा

 1. Ask.uidai.gov.in या अधिकृत UIDAI पोर्टलला भेट द्या
 2. तुम्हाला अपडेट करायचा असलेला फोन नंबर टाका.
 3. कॅप्चा कोड टाका
 4. तुम्हाला ‘ओटीपी पाठवा’ पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या फोन नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकावा लागेल.
 5. सबमिटवर क्लिक करा
 6. त्यानंतर तुम्ही ‘ऑनलाइन आधार सेवा’ नोंदवणारा ड्रॉपडाउन मेनू पाहू शकता. यादी नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि बरेच काही यासह इतर विविध पर्याय दर्शवते.
 7. आधारमध्ये फोन नंबर अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर निवडा.
 8. सर्व संबंधित तपशील अॅड करा
 9. ‘तुम्हाला काय अपडेट करायचे आहे’ हा पर्याय निवडल्याचे सुनिश्चित करा.
 10. एक नवीन पृष्ठ दिसेल, आणि तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
 11. मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, ओटीपी टाकून  आणि ‘सेव्ह आणि प्रोसीड’ पर्यायावर क्लिक करा.

आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update):फोटो कसा बदलायचा ते खाली पाहा

 1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: uidai.gov.in
 2. आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा
 3. फॉर्ममध्ये तपशील भरा आणि फोटो बदलाशी संबंधित आवश्यक माहिती द्या.
 4. फॉर्म भरल्यानंतर, तो कोणत्याही आधार नोंदणी केंद्रात सबमिट करा.
 5. बायोमेट्रिक पडताळणी केंद्रातील एक कार्यकारी तुमच्या तपशीलाची पुष्टी करेल आणि एक नवीन फोटो घेईल.
 6. हे लक्षात घेतले पाहिजे की फोटो बदलण्याच्या सेवेसाठी तुमच्याकडून GST सोबत ₹25 शुल्क आकारले जाईल.
 7. अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) सह पोचपावती स्लिप दिली जाईल

आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update): पत्ता कसा बदलायचा ते खाली पाहा

 1. अधिक माहितीसाठी https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
 2. ‘अपडेट आधार’ सेक्शन शोधा आणि ते सिलेक्ट करा.
 3. तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल, तर ‘अपडेट अॅड्रेस इन युवर आधार’ पर्यायावर क्लिक करा.
 4. त्यानंतर, युजर्सला नवीन पेजवर नेले जाईल.
 5. त्यानंतर, ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा’ सिलेक्ट करा.
 6. याचा परिणाम म्हणून युजर पोर्टलवर आधार कार्ड तपशील त्वरित दुरुस्त करण्यास सक्षम असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी