Aadhaar Update Steps in marathi: आता Aadhaar अपडेट होईल फुकटात; UIDAI ने दिली माहिती

काम-धंदा
भरत जाधव
Updated Mar 17, 2023 | 10:12 IST

Aadhaar Update Steps in marathi:2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच मोदी सरकारने कोट्यवधी आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) मोठा दिलासा दिला आहे. एक भेट दिली आहे. तुमच्याकडे असलेल्या आधार कार्डमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करायचे असतील तर ते तुम्हाला फ्रि फुकट करता येणार आहे.

Now Aadhaar update will be free;
Aadhaar Cardची नवी बातमी वाचली का? काय आहे Update जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आधार कार्ड अपडेटसाठी 50 रुपये चार्ज आकारले जात होते.
  • आधार कार्ड जारी होवून जवळपास 10 वर्षे झाली आहेत. या काळात अनेक लोकांचा पत्ता, नाव बदलले आहेत.
  • सुरक्षेचे कारण पाहून UIDAI कडून सर्व आधार कार्डला अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे.

Aadhaar Update Steps in marathi: नवी दिल्लीः  2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच मोदी सरकारने कोट्यवधी आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) मोठा दिलासा दिला आहे. एक भेट दिली आहे. तुमच्याकडे असलेल्या आधार कार्डमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करायचे असतील तर ते तुम्हाला फ्रि फुकट करता येणार आहे. UIDAI ने याबाबतची माहिती दिली आहे.( Now Aadhaar update will be free; Information provided by UIDAI)  

अधिक वाचा  : पांड्या वहिनींचा हॉट बीच लूक पाहून फुटेल घाम

ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणाऱ्या यूजर्सला आता फुकटात हे अपडेट करता येवू शकणार आहे. पण, यासाठी एक अट आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तेच जर तुम्ही आधार कार्ड फिजिकल काऊंटरवर अपडेट केलं तर त्यासाठी मात्र 50 रुपये द्यावे लागतील. 

कधीपर्यंत फीस लागणार नाही

आधार कार्ड अपडेटसाठी 50 रुपये चार्ज आकारले जात होते. परंतु आता 15 मार्च 2023 पासून 14 जून 2023 पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे. याचाच अर्थ 14 जून 2023 पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही चार्ज लागणार नाही. 

अधिक वाचा  : हे आहेत बॉलिवूडमधील अतिशहाणे कलाकार, झालेत ट्रोल

का घेतला निर्णय

आधार कार्ड जारी होवून जवळपास 10 वर्षे झाली आहेत. या काळात  अनेक लोकांचा पत्ता, नाव बदलले आहेत. त्यामुळे सुरक्षेचे कारण पाहून UIDAI कडून सर्व आधार कार्डला अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. आधार अपडेट ऑनलाइन वेग आणखी वेगवान करण्यासाठी मोदी सरकारकडून 50 रुपये फी तात्पुरती थांबवली आहे.

अधिक वाचा  : पोरं झाल्यानंतर नवरा-बायकोचं नातं कसं घट्ट बनवणार

31 मार्चपर्यंत पॅन, आधार लिंक करणं अनिवार्य 

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. यासोबतच, ज्यांनी 10 वर्षांपासून आधारमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे, यासाठी UIDAI प्राधिकरण सातत्याने माहिती देत आहे. 

कसे कराल ऑनलाइन आधार अपडेट

  • सर्वात आधी myAadhaar portal म्हणजेच  https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा, या ठिकाणी Update your Address Online वर क्लिक करा. 
  • यानंतर Proceed to Update Address वर क्लिक करा. 
  • पुन्हा एक नवी विंडो ओपन होईल. ज्यात तुम्हाला १२ डिजिटचा आधार नंबर टाकावा लागेल. पुन्हा Send OTP वर क्लिक करा. 
  • तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. याला व्हेरिफाय करावे लागेल.
  • पत्ता प्रूफला अपलोड करून सबमिट करावे लागेल.
  • यानंतर तुमचे आधार अपडेट होईल. तसेच १४ डिजिटचे URN जनरेट होईल. या URN च्या मदतीने आधार अपडेट स्टेट्सचा पत्ता लावून त्याला डाउनलोड करता येईल. 

ऑफलाईन अपडेटसाठी लागेल शुल्क 

तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला ठराविक शुल्क भरुन आधार अपडेट करावं लागेल. आधार अपडेट करायला जाताना फोटो आईडी घेऊन जावे लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी