आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची संधी

काम-धंदा
Updated Dec 16, 2019 | 21:17 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Aadhaar - Pan card link last date: आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.

aadhar card pan card link last date 31 december income tax department indian government business news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आधार-पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य
  • आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९
  • यापूर्वी आयकर विभागाने शेवटची तारीख १५ डिसेंबर दिली होती

मुंबई: सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. जर तम्ही आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आता शेवटची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ही शेवटची संधी तुम्ही गमावली तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आधार-पॅन लिंक करणं अनिवार्य असल्याचं आयकर विभागाने सांगितलं आहे. शेवटची तारीख जवळ येण्यापूर्वी आयकर विभागाने एक मेसेज प्रसिद्ध करत नागरिकांना आधार-पॅन लिंक करण्याचं आवाहन केलं आहे.

यापूर्वी आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर होती. मात्र, आता ही तारीख वाढवून ३१ डिसेंबर २०१९ करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आधार-पॅन लिंक करणं अनिवार्य आहे. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना आयटीआर भरताना आपला आधार क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक सांगणं अनिवार्य आहे. 

UIDAI तर्फे भारतीय नागरिकांना आधार कार्ड देण्यात येतं. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भारतीय नागरिकांना पॅन कार्ड देतं. आधार आणि पॅन कार्ड लिंक करणं भारत सरकारने अनिवार्य केलं असून हे लिंक केलं नसेल तर तुम्हाला अनेक सरकारी, बँकिंग, इन्कम टॅक्स भरण्याची कामे करण्यात अडथळे येतात.

असं करा आधार-पॅन लिंक

तुम्ही इन्कम टॅक विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाईवरुन आधार-पॅन लिंक करु शकतात. तसेच एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्ही आधार-पॅन लिंक करु शकतात. एसएमएसच्या माध्यमातून आधार-पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर UIDPAN लिहून स्पेस देत १२ अंकी आधार नंबर नंतर स्पेस देत १० अंकी पॅन नंबर लिहून एसएमएस सेंड करावा लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी