Aadhar-pan card link: आधार-पॅन कार्ड लिंक करण्याबाबत एक अतिशय महत्वाची अपडेट

काम-धंदा
Updated Apr 01, 2019 | 20:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aadhar-pan card link: सरकारने आधार-पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत सहाव्यांदा वाढवली आहे. या कामासाठी लोकांना आणथी सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. 

Aadhar_Pan_link Rep
आधार-पॅन कार्ड लिंक करण्याबाबत एक अतिशय महत्वाची अपडेट  |  फोटो सौजन्य: Representative Image

नवी दिल्ली: सरकारने आधार-पॅन कार्ड  लिंक करण्याबाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आता सरकारने यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदत वाढवली आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आपण आधार पॅनशी लिंक करु शकतात. याबाबतची माहिती एका अधिकृत निवदेनात देण्यात आली आहे. आतापर्यंत सरकारने सहा वेळा पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. 

सरकारने मागील वर्षी जाहीर केलं होतं की, प्रत्येक व्यक्तीने ३१ मार्च २०१९ पर्यंत बायोमेट्रिक ओळख असलेलं आधारकार्ड हे पॅन कार्डशी लिंक करायचं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने आज जारी केलेल्या वक्तव्यात असं म्हटलं आहे की, 'जर कोणतीही विशिष्ट सूट देण्यात आली नाही तर, आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०१९ असणार आहे.' 

दरम्यान, यासोबतच असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की, १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबरचा उल्लेख करणं गरजेचं आहे. पण आता सरकारने पुन्हा एकदा आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची मुदत वाढवल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

आपलं आधारकार्ड असं लिंक पॅनशी... 

जर आपण आतापर्यंत आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक केलं नसेल तर आता अवघ्या २ मिनिटात हे काम करु शकता. आयकर विभागाने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी आपल्याला लॉग इन करण्याची गरज नाही. 

आपण SMS च्या माध्यमातून देखील आधार कार्ड पॅन नंबरशी लिंक करु शकता. यासाठी आपल्याला एसएमएस ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबरवर पाठवायचा आहे. हा एसएमएस आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवर पाठवायचा आहे. 

आधार पॅन लिंक करण्यासाठी सगळ्यात आधी कॅपिटल लेटरमध्ये UIDPAN लिहून स्पेस देऊन १२ अंकी आधार नंबर लिहा. त्यानंतर स्पेस देऊन १० अंकी तुमचा पॅन नंबर लिहा. त्यानंतर हा एसएमएस  ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबरवर पाठवा. 

समजा, आपला आधार नंबर १२३४५६७८९३२१ असा असेल आणि पॅन कार्ड नंबर ABCDE1234F आहे. तर आपण मेसेज असा पाठवा. 

UIDPAN 123456789321 ABCDE1234F या फॉर्मेटमध्ये हा मेसेज पाठवा. यानंतर तुमच्या मोबाइलवर आधार लिंक झाल्याचा मेसेज येईल. 

आपण आयकर विभागाची वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन देखील आपला आधार नंबर पॅन कार्डशी लिंक करु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी