IAS Success Story: इंग्लिशची वाटायची भीती, मेहनत केली अन् झाला IAS अधिकारी

IAS success story of abhishek sharma: जम्मू-काश्मीरमधील रहिवासी अभिषेक शर्मा इंग्रजीत उत्तर देण्यास घाबरत होता पण भीतीपोटी त्याने पळ काढला नाही. त्यांनी लढा दिला आणि आयएएस म्हणून दर्शविले.

abhishek sharma was afraid of english after working hard he became a ias officer
इंग्लिशची वाटायची भीती, मेहनत केली अन् झाला IAS अधिकारी  |  फोटो सौजन्य: Twitter

IAS success story of abhishek sharma: जम्मू-काश्मीर: मेहनत करणाऱ्यांची कधीही हार होत नाही. जर कठोर मेहनत केली तर जगातील कोणतेही काम अशक्य नाही. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी अभिषेक शर्मा याने देखील याच गोष्टी अचूक असल्याचे सिद्ध केले. अभिषेकला इंग्रजीत उत्तर देण्याची भीती वाटायची पण या गोष्टीला घाबरुन त्याने कधी पळ काढला नाही. पण त्याने चिकाटीने मेहनत करत या गोष्टीवर मात केली. त्यानंतर, देशातील सर्वात कठीण मानल्या जाणार्‍या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)च्या परीक्षेत थेट ६९वा  क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचा मान मिळवला. 

अभिषेक शर्माची कहाणी त्या सर्व तरुणांसाठी एक उदाहरण आहे जे कोणत्या तरी गोष्टीची भीती बाळगून एका कोशात अडकून राहतात. आपल्यात आत्मविश्वास कमी असणं, इंग्रजी चांगल्याप्रकारे बोलू किंवा न समजल्यास आपण त्याविषयी भीती बाळगतो. पण अशा गोष्टींपासून घाबरण्याऐवजी फक्त त्याच्याशी लढा देऊन आपण त्यावर यशस्वी मात करु शकता. अभिषेकनेही तेच केलं. २००७ साली त्याने आयएएसमध्ये ६९वा क्रमांक मिळविला.

आपल्या मुलाखतीबाबत स्वत: अभिषेक म्हणाला होता की, मी अशा भागातून आलो आहे की, जिथे फारच कमी लोकं आयएएस झाले आहेत. मी नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिलं होतं. सुरुवातीला त्याने दिल्लीत येऊन कोचिंग सुरू केलं. अभिषेकचं सुरुवातीचं शिक्षण हे हिंदी माध्यमात झालं होतं. अभिषेक दोनदा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत पास झाला होता. पण मुलाखत पास करू शकला नव्हता. त्याला असं वाटायचं की, त्याला इंग्रजीत उत्तर देता येणार नाही. काहीशी भीतीआणि कमकुवत इंग्रजी ही त्याची अडचण होती.

यानंतर त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्र सतत वाचणं सुरु केलं. तो दिवसा इंग्रजी वर्तमानपत्र वाचत असे. काही दिवसांत त्याचं इंग्रजी खूपच चांगलं झालं आणि २००७ मध्ये त्याला अखेर यूपीएससीमध्ये यश मिळालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी