IT-BPM Jobs | चालू आर्थिक वर्षात आयटी-बीपीएम क्षेत्रात मिळणार ३.७५ लाख नोकऱ्या

Jobs: 'टीमलीज डिजिटल एम्प्लॉयमेंट आउटलुक' या टीमलीज सर्व्हिसेसच्या रिपोर्टनुसार मार्च २०२२ पर्यत आयटी-बीपीएम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या ४४.७ लाखांवरून वाढून ४८.५ लाखांवर पोचणार आहे. आयटी (IT)आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (BPM)या क्षेत्रांमध्ये चालू आर्थिक वर्षात ३.७५ लाख नव्या नोकऱ्या (new jobs) मिळण्याची शक्यता आहे. यावर्षीदेखील आयटी क्षेत्रात नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

Jobs in IT sector in India
भारतात आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी 
थोडं पण कामाचं
  • आयटी-बीपीएममध्ये तरुणांना असणार मोठी संधी
  • यावर्षी ३.७५ लाख पदांची भरती होण्याची शक्यता
  • डिजिटल कौशल्यांना वाढती मागणी

IT Jobs Opportunities | नवी दिल्ली : आयटी (IT)आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (BPM)या क्षेत्रांमध्ये चालू आर्थिक वर्षात ३.७५ लाख नव्या नोकऱ्या (new jobs) मिळण्याची शक्यता आहे. या नव्या नोकऱ्यांसह आयटी-बीपीएममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ४८.५ लाखांवर पोचू शकते. मागील वर्षी कोरोना संकट (Corona pandemic)आल्यापासून अनेक क्षेत्रांमधील लोकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. मात्र ज्या काही मोजक्या क्षेत्रातील लोकांचा रोजगार (employment) टिकून होता त्यात आयटी क्षेत्र होते. आयटी क्षेत्रात वर्षभरात चांगली नोकरभरती (Recruitment) झाली होती. यावर्षीदेखील आयटी क्षेत्रात नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. (About 3.75 lakhs job opportunities in IT-BPM sector in this financial year)

टीमलीजचा अहवाल

'टीमलीज डिजिटल एम्प्लॉयमेंट आउटलुक' या टीमलीज सर्व्हिसेसच्या रिपोर्टनुसार मार्च २०२२ पर्यत आयटी-बीपीएम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या ४४.७ लाखांवरून वाढून ४८.५ लाखांवर पोचणार आहे. या अहवालानुसार आयटी-बीपीएम क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्याने आणि देशातील कंपन्याद्वारे तंत्रज्ञानाला वेगाने स्वीकारल्यामुळे या क्षेत्रात नोकरभरतीसंदर्भात सकारात्मक परिस्थिती आहे. 

कर्मचारी-कंपनी यांच्यात सकारात्मक वातावरण

या अहवालाला तयार करताना १०० पेक्षा जास्त कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्वे आणि मुलाखतीनंतर त्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या अहवालात म्हटले आहे की फक्त नोकरभरती संदर्भातच परिस्थिती सकारात्मक आहे असे नाही तर कर्मचारी-कंपनी यांच्यातील संबंधांच्या मॉडेलवरही याचा परिणाम होतो आहे. अहवालानुसार या उद्योगात जिथे पूर्णवेळ रोजगारात वृद्धी होते आहे तिथे १७ टक्के वाढीसह कंत्राटी कर्मचाऱ्यांनादेखील बाजारातील सकारात्मक परिस्थितीचा फायदा होणार आहे.

डिजिटल स्किलची जोरदार मागणी

या अहवालानुसार मार्च २०२२ पर्यत आयटी क्षेत्रातील पर्सनल आणि ट्रेनिंग विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या १.४८ लाखांवर पोचण्याची शक्यता आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की आयटी-बीपीएम क्षेत्रात सध्या डिजिटल कौशल्यांची सर्वाधिक मागणी आहे आणि या क्षेत्रात सर्वाधिक संधी डिजिटल कौशल्ये असणाऱ्यांना मिळते आहे. डिजिटल कौशल्यांमध्ये सध्या १३ स्किल सेटची जबरदस्त मागणी आहे.

चालू आर्थिक वर्षात डिजिटल स्किलसंदर्भातील टॅलेंटची मागणी ७.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. हाच ट्रेंड कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतदेखील पाहिला जातो आहे. अहवालात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत डिजिटल स्किल असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी ५० टक्क्यांनी वाढू शकते. मागील वर्षाच्या तुलनेत यात १९ टक्के वाढ अपेक्षित आहे.

देशातील आयटी क्षेत्र वेगाने विस्तारते आहे. त्यातच कोरोनाच्या संकटकाळात बहुतांश क्षेत्रे डिजिटल स्वरुपात काम करू लागली आहेत. त्यामुळे भारतातील आयटी सेवांची आवश्यक वाढली आहे. आगामी काळात डिजिटल स्वरुपातच अनेक कामे होणार असल्यामुळे याच्याशी निगडीत तंत्रज्ञान आणि सेवा यांना मोठी मागणी असणार आहे. परिणामी या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संंधी निर्माण होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी