मुंबई : रेल्वेने आजपासून जुनी प्रणाली लागू करून एसी थ्री-टायर इकॉनॉमी क्लासचे भाडे कमी केले आहे. आता प्रवाशांना AC-3 टियरच्या तुलनेत इकॉनॉमी क्लासमध्ये 60-70 रुपये कमी मोजावे लागतील. (AC 3-tier economy travel in train is cheaper from today)
अधिक वाचा : Pension Scheme । आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
स्वस्त एसी प्रवास सेवा देण्यासाठी रेल्वेने सप्टेंबर 2021 मध्ये AC-3 इकॉनॉमी कोच सादर केला होता, परंतु नोव्हेंबर 2022 मध्ये AC 3-tier इकॉनॉमी आणि AC 3-tier च्या विलीनीकरणामुळे, दोन्ही वर्गांचे भाडे समान झाले.
आदेश जारी करताना, रेल्वेने म्हटले आहे की ज्या प्रवाशांनी पुढे तारखेसाठी आधीच ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकीट बुक केले आहे, त्यांना नवीन दरांनुसार पैसे परत केले जातील. पण, ज्या प्रवाशांनी काउंटरद्वारे ऑफलाइन तिकीट बुक केले आहे त्यांना उर्वरित रक्कम परत मिळविण्यासाठी पुन्हा तिकीटांसह बुकिंग काउंटरवर जावे लागेल.
अधिक वाचा : आजच पूर्ण करा 'ही' चार कामे, अन्यथा बिघडेल आर्थिक बजेट, 31 मार्च आहे डेडलाईन
रेल्वेने जेव्हा AC-3 इकॉनॉमी कोच आणला तेव्हा प्रवाशांना चादर आणि ब्लँकेट दिले जात नव्हते, परंतु हा वर्ग AC-3 मध्ये विलीन केल्यानंतर, भाडे समान केले गेले. त्यामुळे एसी-३ इकॉनॉमी कोचमध्ये चादर आणि ब्लँकेटही देण्यात आले. आता रेल्वेने जुनी प्रणाली पुन्हा लागू केली असली तरी चादर आणि ब्लँकेट देण्याची व्यवस्था मागे घेण्यात आलेली नाही.