Accenture Layoffs:जगभरातील आयटी आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याची भीती आहे. मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या यादीत, जगातील सर्वात मोठ्या सल्लागार कंपन्यांपैकी एक, ग्लोबल IT कंस्लटिंग फर्म Accenture ने मोठ्या प्रमाणात नोकर कपात जाहीर केली आहे. (Accenture to lay off 19,000)
अधिक वाचा : Aadhar कार्डधारकांना सरकारने दिला दिलासा… आता या तारखेपर्यंत करू शकणार मतदार ओळखपत्र लिंक
Accenture या कंपनीने जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक परिस्थिती आणि मंद महसूल वाढीदरम्यान सुमारे 19,000 कर्मचार्यांची काढून टाकण्याची घोषणा केली आहे. FY23 च्या दुसर्या तिमाहीचे तिमाही निकाल सादर करताना, कंपनीने वार्षिक महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाज देखील कमी केला आहे.
अधिक वाचा : How To Register on SBI YONO App: YONO SBI मध्ये ५ मिनिटांत नोंदणी कशी करावी, जाणून घ्या
एक्सेंचरने सांगितले की ते त्यांचे कर्मचारी संख्या 2.5 टक्के कमी करेल. ही संख्या 19,000 च्या जवळपास आहे. कंपनीच्या तिसर्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारीनुसार, तिचा वार्षिक महसूल आणि नफा कमी होऊ शकतो. नोकऱ्या गमावलेल्या 19,000 लोकांपैकी अर्ध्याहून अधिक लोक हे कंपनीच्या नॉन-बिलेबल कॉर्पोरेट फंक्शन्समध्ये काम करतात. Accenture च्या महसुलात आता 8 ते 10 टक्के वाढ होऊ शकते.
अधिक वाचा : Train Fare Reduced: रेल्वे प्रवास झाला आणखी स्वस्त, रिझर्वेशनचे पैसेही परत मिळणार
यापूर्वी Amazon ने एकूण 27,000, Google ने 12,000 आणि Microsoft ने 11,000 लोकांना नोकरीतून काढून टाकले आहे. मेटा (फेसबुक) देखील 10,000 लोकांना काढून टाकण्याची योजना आखत आहे.