According to 7th pay commission salary of government employees will be increased by 49 thousand : नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ४९ हजार रुपयांनी वाढणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
सध्या केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन दरमहा १८ हजार रुपये आहे. या वेतनात वाढ करण्याची मागणी कर्मचारी करत आहेत. फिटमेंट फॅक्टर २.५७ नुसार किमान मूळ वेतन दरमहा १८ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. कर्मचारी फिटमेंट फॅक्टर ३.६८ नुसार पगार देण्याची मागणी करत आहेत. ही मागणी मान्य झाल्यास किमान मूळ वेतन १८ हजार रुपयांऐवजी २६ हजार रुपये होईल.
सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ नुसार १८ हजार रुपये गुणिले २.५७ या आधारे ४६ हजार २६० मिळतात. या उलट फिटमेंट फॅक्टर ३.६८ नुसार पगार दिल्यास २६ हजार रुपये गुणिले ३.६८ या आधारे ९५ हजार ६८० रुपये मिळतील. याचाच अर्थ पगार ४९ हजारांनी वाढेल.
सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए), टीए, एचआरए व्यतिरिक्त मूळ वेतन गुणिले निश्चित केलेले फिटमेंट फॅक्टर असा गुणाकार केला जातो. केंद्र सरकार सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ नुसार किमान मूळ वेतन १८ हजार रुपये आणि महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ३१ टक्के देत आहे. फिटमेंट फॅक्टर ३.६८ निश्चित झाल्यास महागाई भत्ता (डीए), टीए, एचआरए व्यतिरिक्त मूळ वेतन २६ हजार रुपये होईल. मूळ वेतन गुणिले नवे फिटमेंट फॅक्टर हा गुणाकार ९५ हजार ६८० रुपये होईल.