Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांना मोठा झटका, 3 महिन्यांत झाले 8 हजार कोटींचे नुकसान

Share Market Investment : शेअर बाजारातील (Share Market)बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठा तोटा सहन करावा लागला आहे. ते शेअर बाजाराच्या जगतात बिग बुल म्हणून देखील ओळखले जातात. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने राकेश झुनझुनवाला यांच्या मालमत्तेत तब्बल 25% घट झाली आहे.

Rakesh Jhunjhunwala
राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील सुप्रसिद्ध गुंतवणूकदार
  • राकेश झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण
  • राकेश झुनझुनवालांच्या गुंतवणूक मालमत्तेत तीन महिन्यात 8,000 कोटींची घसरण

Rakesh Jhunjhunwala Portfolio : नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठा तोटा सहन करावा लागला आहे. ते शेअर बाजाराच्या जगतात बिग बुल म्हणून देखील ओळखले जातात. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने राकेश झुनझुनवाला यांच्या मालमत्तेत तब्बल 25% घट झाली आहे. Trendlyne च्या डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांची निव्वळ संपत्ती जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत 24.67 टक्क्यांनी घसरून 25,425.88 कोटी रुपयांवर आली आहे. जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 33,753.92 कोटी रुपयांपर्यंत वाढली होती. म्हणजेच गेल्या तिमाहीत त्यांचे एकूण 8,328.04 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (Ace investor Rakesh Jhunjhunwala loses Rs 8,000 crore in 3 months in share market)

अधिक वाचा : ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड

राकेश झुनझुनवाला यांचा गुंतवणूक पोर्टफोलिओ

राकेश झुनझुनवाला यांची 33 सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. राकेश झुनझुनवाला यांनी सर्वाधिक गुंतवणूक टाटा समूहाच्या टायटन या कंपनीच्या शेअरमध्ये केली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी या टायटनमध्ये 8,728.9 कोटी रुपये, स्टार हेल्थमध्ये 4,755.2 कोटी रुपये आणि मेट्रो बँडमध्ये 2,431.8 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बिग बुलने टाटा मोटर्समध्ये 1,619.8 कोटी रुपये आणि क्रिसिलमध्ये 1315 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

अधिक वाचा : Aadhaar Card Validity: आधार कार्ड किती दिवसांसाठी व्हॅलिड असते? त्याची मुदत कधी संपते ते जाणून घ्या

कोणते शेअर्स गडगडले?

डेल्टा कॉर्प आणि नेटवर्क 18 या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 48% घसरण झाली आहे. तर दुसरीकडे, इंडियाबुल्सच्या शेअरच्या किंमतीत 45%, नाल्कोच्या शेअरच्या किंमतीत 44% आणि इंडियाबुल्स फायनान्सच्या शेअरच्या किंमतीत 43% ची जबरदस्त घसरण झाली आहे. याशिवाय अॅपटेक, डिशमन कार्बोजेन, स्टार हेल्थ यासारख्या कंपन्यांच्या शेअर्अच्या किंमतीत 31 ते 40 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today,04 July 2022: सोने कडाडले, चांदीदेखील चमकली, पाहा ताजा भाव

आपल्या गुंतवणूक कौशल्याने भारताचे वॉरेन बफे (Warren Buffett)अशी ख्याती राकेश झुनझुनवाला यांनी मिळवली आहे. त्यांच्या कृतींकडे, त्यांच्या पोर्टफोलिओकडे सर्वांचेच लक्ष असते. शेअर बाजाराबद्दल, अर्थव्यवस्थेबद्दल किंवा एखाद्या कंपनीबद्दल राकेश झुनझुनवाला काय म्हणतात किंवा त्यांनी काय म्हटले याकडे सर्व काळजीपूर्वक पाहत असतात. राकेश झुनझुनवाला यांनी एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले किंवा त्यातील हिस्सा वाढवला (Rakesh Jhunjhunwala Portfolio) तर गुंतवणुकदारांचे लक्ष ताबडतोब त्या शेअर्सकडे जाते. कारण झुनझुनवाला यांचे शेअर्समध्ये कमाईची जोरदार संधी असे समीकरण निर्माण झाले आहे. मात्र आता मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा फटका खुद्द राकेश झुनझुनवाला यांनादेखील बसला आहे. 

राकेश झुनझुनवाला यांनी अलीकडेच आपले नवे 13 मजली आलिशान घर (Rakesh Jhunjhunwala house) मुंबईतील मलबार हिल येथे बांधले आहे. मात्र या घराच्या बांधणीची कथाही रंजक आहे. राकेश झुनझुनवाला यांनी आपले आलिशान घर बांधण्यासाठी त्या प्लॉटमध्ये एक इमारत होती. मलबार हिलच्या त्या प्लॉटमध्ये रिजवे अपार्टमेंट्स नावाची एक छोटी आणि सुंदर इमारत होती. त्यात दोन मोठ्या बहुराष्ट्रीय बँकांच्या मालकीचे फक्त 12 अपार्टमेंट होते. या इमारतीत बँकेचे वरिष्ठ अधिकारी राहत होते. उंच छत, छान मांडणी आणि मरीन ड्राईव्हची सुंदर दृश्ये असलेली ही सुंदर प्रशस्त अपार्टमेंट होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी