Gautam Adani : अदानी समूह ऊर्जेमध्ये $70 अब्ज गुंतवणूक करणार

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित केले. गौतम अदानी यांनी सांगितले की, भारताने अक्षय ऊर्जेत मोठी झेप घेतली आहे.

Adani Enterprises to invest $70 billion in energy in clean energy
अदानी एंटरप्रायझेस ऊर्जेमध्ये $70 अब्ज गुंतवणूक करणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित केले.
  • गौतम अदानी यांनी सांगितले की, भारताने अक्षय ऊर्जेत मोठी झेप घेतली आहे.
  • भारताच्या विकास दरावर माझा पूर्ण विश्वास आहे.

Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित केले. गौतम अदानी यांनी सांगितले की, भारताने अक्षय ऊर्जेत मोठी झेप घेतली आहे. (Adani Enterprises to invest $70 billion in energy in clean energy)

भारताच्या विकास दरावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, भारताच्या विकासाच्या गतीशी बरोबरी करणारा दुसरा कोणताही देश नाही. गौतम अदानी म्हणाले की, सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आणि वायू आयात करणारा देश आहे, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की, लवकरच भारत जगाला स्वच्छ ऊर्जा निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनेल.

यासोबतच पुढे म्हणाले की, माझा माझ्या देशातील नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे, जे भारताच्या विकासाची गती कायम ठेवतील आणि यामुळे अदानी समूहाला पुढे नेण्यात मदत होईल. 

अधिक वाचा : 12वी नंतर करा हे कोर्स आणि कमवा लाखो रूपये

अदानी समूहाचे अध्यक्ष  गौतम अदानी यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषण केले, वाचा जसेच्या तसे... 

 भागधारक मित्रहो!
नमस्कार! सुप्रभात !! 
आज घडीला जग ज्या वातावरणातून जात आहे त्याला "अनिश्चित" म्हणणेही पुरेसे होणार नाही. वाढती महागाई, विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, लोकांचे वाढते विस्थापन, आरोग्य सेवांचा फोलपणा, शिक्षण क्षेत्रात आलेले साचलेपण, चलन बाजारातील अस्थिरता आणि अडखळती रोजगार निर्मिती या सा -या लक्षणांमधून विविध पातळ्यांवर आलेल्या संकटांच्या घातक परिणामांशी सामना करण्याची सर्वच देशांची क्षमता पणाला लागली आहे हे स्पष्ट दिसते.  

गेल्या १८ महिन्यांत कोविड -१९ ची महामारी स्थिती भारताने इतर देशांच्या तुलनेत चांगली हाताळली हे नाकारता येणार नाही. या १८ महिन्यांत भारतात प्रतिबंधक लसीचे २०० कोटी डोस देण्यात आले - ही संख्या उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोप यांच्या एकूण लोकसंख्ह्येपेक्षा जास्त आहे. यातून जगाला एक ऐतिहासिक शिकवण मिळाली असेल. कितीही कठीण परिस्थिती असली तरी भारत त्यातून सावरून पुन्हा उभा राहू शकतो हेच यातून सिद्ध  झाले आहे .  

सध्याच्या रशिया युक्रेन संघर्षांत भारताने कोणतीही बाजू न घेता ठाम भूमिका घेतली आहे. या राजनीतिक भूमिकेतून दिसलेल्या भारताच्या आत्मविश्वासाबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भविष्यातील बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय स्थितीत भारत अभिमानाने आपले स्थान टिकवेल याचे हे द्योतक आहे.  वातावरणातील बदलांबाबत आपल्याला अनेकदा उपदेश केला जातो, पण भारताने कोव्हिड च्या काळात आणि ऊर्जा संकटात असूनही पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून वीज निर्मितीत वाढ केली आहे. अनेक विकसित देशांनी त्यांची पुनर्वापरक्षम वीजनिर्मिती ची उद्दिष्टे स्थगित ठेवली असताना भारताने केलेली हे कामगिरी लक्षणीय आहे. पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून होणा-या वीज निर्मितीची भारताची क्षमता २०१५ पासून आजवर ३०० टक्क्यांनी वाढली आहे. अशा वीजनिर्मिती भारतात २०२१-२२ मध्ये  २०२०-२१ च्या तुलनेत १२५ टक्के भांडवल गुंतवण्यात आलेले आहे. विजेच्या वाढीव मागणीपैकी ७५ टक्क्यांहून जास्त मागणी पुनर्वापरक्षम स्रोतांपासून निर्मिली जात असून ही प्रगती रोखणे आता कोणालाही शक्य नाही.  

अधिक वाचा :  उपवासासाठी ट्राय करा खास मखाना भेळ

या सर्व पार्श्वभूमीवर भारताने समतोल साधत केलेल्या वाटचाली बद्दल सरकारला पूर्ण श्रेय द्यावे लागेल. कोव्हिड संकटातून सावरत असताना अनेक बड्या देशांना मंदीचा सामना करावा लागत असतानाच  भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने प्रगती करत आहे. आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मिळालेल्या संकेतांवरून मी असे खात्रीने म्हणेन  की भारताच्या अर्थव्यवस्थेची ८ टक्के अंदाजित वृद्धी प्रत्यक्ष पहायला मिळेल.  

आता मी आपल्या कंपनीविषयी काही सांगेन. अदाणी समूहाच्या दृष्टीने 2021-22 हे वर्ष महत्वपूर्ण होते. मी अनेकदा म्हणतो की आपल्या भूतकाळाबद्दलचा अभिमान आपली भविष्यातील क्षमता अधोरेखित करतो आणि त्यातूनच आपण सध्या नव्या योजनांची आखणी करीत आहोत. भारतात गुंतवणूक करण्याच्या आमच्या भूमिकेवर  आहोत आणि या गुंतवणुकीचा वेग कमी झालेला नाही. आमच्या व्यवसायाची व्याप्ती, वैविध्य आणि आमची सातत्यपूर्ण कामगिरी याच्या आधारावर आम्ही भविष्यात चांगली प्रगती करण्यासाठी सिद्ध आहोत. भारताच्या आणि भारतवासीयांच्या आकांक्षांबद्दल आम्हाला वाटणारी श्रद्धा आम्हाला आत्मविश्वास देते. भारताच्या प्रगतीशी संलग्न धोरणांचा स्वीकार हेच अदाणी समूहाच्या यशाचे गमक आहे आणि प्रगतीची संधी भारताइतकी अन्य कोणत्याही देशाला नाही असे माझे ठाम मत आहे. 

भविष्यातील प्रगतीबद्दलचा आमचा विश्वास अधोरेखित करणारा पुरावा म्हणजे हरित ऊर्जा क्षेत्राकडील भारताच्या वाटचालीला साह्य करण्यासाठी केलेली ७० अब्ज डॉलर गुंतवणूक. जगातील प्रमुख सौर ऊर्जा निर्मिती करणा-या कंपन्यांच्या यादीमध्ये आम्ही याआधीच स्थान मिळविले आहे. या क्षेत्रातील आमच्या क्षमतेच्या आधारावर आम्हाला भविष्यात हायड्रोजन वायू  इंधन म्हणून वापरण्यासाठीच्या प्रयत्नांत मोठे योगदान देता येईल. खनिज तेल आणि वायू यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला देश ते भविष्यात हरित ऊर्जा निर्यात करणारा देश या भारताच्या परिवर्तनात आमची आघाडीची भूमिका असेल.  

अधिक वाचा :  फॅमिलीसोबत टूरला जाण्यासाठी 'य़ा' आहेत Best जागा

पुनर्वापरयोग्य ऊर्जेच्या बाबतीत आमचे जगातील स्थान बळकट होत असले तरी गेल्या १२ महिन्यांत इतर अनेक उद्योगात आम्ही लक्षणीय प्रगती साधली आहे. आम्ही आता देशातील सर्वात मोठी विमानतळ व्यवस्थापन कंपनी आहोत.  आमच्या  व्यवस्थापनातील विमानतळाच्या सभोवतीच्या परिसरात नवी वित्तीय केंद्रे वसविण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत.    

भारतातील पायाभूत सुविधा विकासाच्या प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत आणि देशातील सर्वात मोठ्या रस्ते बांधणी प्रकल्पांबरोबरच बंदरे, मालवाहतूक व्यवस्थापन, वीज पारेषण आणि वितरण, पाईपलाइन द्वारे पुरविण्याचा गॅस अशा व्यवसायांमध्ये आमचा  मोठा हिस्सा आहे. अदाणी विल्मार च्या यशस्वी समभाग विक्रीनंतर आम्ही देशातील देशातील  सर्वात मोठी ग्राहकोपयोगी वस्तू विकणारी कंपनी झालो आहोत. आणि होलसिम चा व्यवसाय विकत घेतल्यामुळे - ज्यात ए सी सी आणि अंबुजा सिमेंट या नामवंत कंपन्यांचा समावेश आहे - आता देशातील दुस-या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक झालो आहोत. संलग्न व्यवसाय या आधारावर धंदा वाढविण्याच्या आमच्या धोरणाचे हे एक उदाहरण आहे.  याशिवाय डेटा सेंटर , डिजिटल सुपर ऍप आणि संरक्षण, विमान निर्मिती, धातू , आणि औद्योगिक सामग्री  यांसारख्या सरकारच्या "आत्मनिर्भर भारत" धोरणाशी सुसंगत व्यवसायातही आम्ही प्रवेश केला आहे.  
आमच्या उद्योगसमूहाचे एकत्रित बाजारमूल्य यावर्षी २०० अब्ज डॉलर पेक्षाही जास्त होते. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातून अब्जावधी डॉलर चे भांडवल उभे  शकलो यातूनच भारत आणि अदाणी समूहाबद्दल असलेला विश्वास दिसून येतो. आमचे व्यावसायिक यश आणि प्रगती यांची दखल जगभरात घेतली गेली आहे.  अनेक परदेशी सरकारे आता आम्हाला त्यांच्या देशांत उद्योग काढून तेथील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आग्रह करीत आहेत. यामुळेच २०२२ या वर्षात आम्ही भारताच्या  सीमा ओलांडून इतर देशात व्यवसाय करण्याची पायाभरणी केली आहे.

अधिक वाचा :  या सवयींमुळे वाढू शकते इनफर्टिलीटी

आमच्या कंपन्यांच्या वाढत्या बाजार मूल्याच्या मुळाशी आमच्याकडील रोख उपलब्धतेची दमदार वाढ, हा मुद्दा आहे.  सर्वोत्तम व्यवहार आणि क्षमतेत सततची वाढ यामुळे आमच्या करपूर्व उत्पन्नात २६ टक्के वाढ झाली आहे. एकूण व्यवसायाचे करपूर्व उत्पन्न ४२,६२३ रुपये एवढे होते. ही वैविध्यपूर्ण व्यवसायवृद्धी आमच्या सर्वच व्यवसायांच्या बाबतीत दिसून आली. आमच्या वीज व्यवसायात २६ टक्के वाढ झाली,  वाहतूक व्यवस्थापन व्यवसाय १९ टक्के वाढला, ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसाय ३४ टक्के वाढला आणि अदाणी एंटरप्रायझेस (AEL) हा मूळ व्यवसाय ४५ टक्क्यांनी वाढला. या कंपनीच्या खास व्यवसाय पद्धतीला तोड नाही आणि आम्ही  त्या आधारे आणखीही प्रगती करणार आहोत.  AEL ची जोमदार प्रगती हा समूहाच्या सततच्या उत्कर्षाचा आणि येत्या दशकातील भरभराटीचा पाया ठरेल.  
मागे वळून पाहता आम्हाला समाधान वाटते, परंतु आत्ताच आम्ही खरा वेग घेतला आहे. गेल्या दोन दशकांत आम्ही जी प्रगती केली त्यामुळे आणि पायाभूत सुविधांच्या परिसरात केलेल्या व्यवसाय विकासामुळे आम्ही देशातील सर्वात मोठी एकात्मिक पायाभूत सुविधा कंपनी म्हणून उदयाला आलो आहोत.  यातूनच आमची अनेक व्यवसायांचा एकत्रित पाया ( ‘platform of platforms’ ) अशी ख्याती झाली असून त्यामुळे आम्हाला भारतीय ग्राहकांच्या  अगदी जवळ जाणे शक्य झाले आहे. येत्या अनेक दशकांत अन्य व्यवसाय (B2B) आणि ग्राहक (B2C) या दोन्हींशी संलग्न राहत प्रगती करण्याची क्षमता असलेली इतर कोणतीही कंपनी माझ्या डोळ्यांसमोर नाही. 

अधिक वाचा : दोन अंगठे असलेल्या लोकांचा कसा असतो स्वभाव?

भागधारक मित्रहो, 
मी एक हट्टी आशावादी आहे. उद्योजक म्हणून कसे विकसित व्हायचे आणि उत्कर्ष साधायचा याचे शिक्षण देणारा भारत हा एक बलशाली देश आहे यावर माझी कायमच श्रद्धा आहे.  आजच्या तरुणांमध्ये मला आपले आर्थिक सामर्थ्य पुन्हा मिळवून जगाच्या व्यवहारांत एक महत्वाचा देश म्हणून भारताला स्थान मिळवून देण्याची ऊर्मी स्पष्ट दिसते आहे. मी याआधी ही म्हटले आहे की जगातील सर्वात मोठा मध्यमवर्ग भारतात असेल आणि या स्थितीला काम करण्याच्या आणि सुखी जीवन उपभोगण्याच्या वयाच्या व्यक्ती जास्त संख्येने असल्याची जोड ही ताकद अनेक दशके टिकून राहणारी आहे.  लोकसंख्येत तरुण व्यक्तींची संख्या जास्त असण्याचा भारताच्या आर्थिक प्रगतीवर चांगला परिणाम होणार आहे. यातच अधिक प्रशिक्षित, अधिक शिकलेला, अधिक सुदृढ आणि तंत्रज्ञानाचा कुशल वापर करणारा कर्मचारीवर्ग उदयाला येईल आणि आपल्या आकांक्षांची पूर्ती करीत जीवनाची पातळी उंचावेल. हे चित्र येत्या दशकात प्रत्यक्ष  मला काहीही शंका नाही.  

अधिक वाचा :  श्रावणात उपवास ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे

येथे मला २०२२ या वर्षाचे माझ्या वैयक्तिक दृष्टीने असलेले महत्त्व सांगायचे आहे. या वर्षी माझे पिता आणि आदर्श श्री शांतीलाल अदाणी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि माझ्याही षष्ट्यब्दीपूर्तीचे वर्ष आहे. यानिमित्ताने अदाणी कुटुंबाने  एकत्रितपणे मुख्यतः ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी ६०,००० कोटी रुपयांची रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही क्षेत्रांचा स्वतंत्र विचार न करता एकत्रितपणे केला पाहिजे कारण संतुलित आणि भविष्याला सामोरे जाण्याला सिद्ध समाज निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कोट्यवधी भारतीयांना कायमचे वर आणण्याची आपल्याला संधी आहे. हे आपले आपल्याला तसेच देशासाठीचे दायित्व आहे.  मोठ्या  प्रकल्प उभारणीचा आमचा अनुभव आणि अदाणी न्यासाने हाती घेतलेली विविध कामे यातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ आम्हाला मिळेल आणि समाजाच्या सर्वात गरजू घटकांपर्यंत आमच्या कामाचा फायदा पोचेल.  

अधिक वाचा :  सडपातळ लोकांचे वजन का नाही वाढत?

माझा देशाबद्दलचा आशावाद आजच्याइतका उंच कधीच नव्हता.  
नव्याने उभे राहण्याच्या जिद्दीतून आशावाद निर्माण होतो  
स्वतः वरील विश्वासातून ही जिद्द जन्मते 
आणि हा विश्वास म्हणजेच आशावाद ठरतो   
आमच्या बाबतीत असे म्हणता येईल :
भारतात दिसणारी नवनिर्मितीची जिद्द , 
देशातल्या लोकांच्या डोळ्यांत दिसणारा आशावाद 
आणि भारताच्या प्रगतीबद्दल दृढविश्वास ही अदाणी समूहाच्या व्यवसायाची प्रेरणा आहे. 
धन्यवाद! 
जय हिंद!!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी