Adani Group Latest : अदानींचा आता मीडियामध्येही होणार बोलबाला... विकत घेतला या मीडिया कंपनीचा 49% हिस्सा, काय आहे प्लॅन?

Quintillion Business Media : अदानी समूहाची (Adani group)मीडिया कंपनी असलेल्या एएमजी मीडिया नेटवर्क्सने (AMG Media Networks) राघव बहल यांच्या क्विंटिलियन बिझनेस मीडियामध्ये (Quintillion Business Media)या डिजिटल बिझनेस न्यूज प्लॅटफॉर्मचा 49 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अदानी समूहाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 49 टक्के हिस्सा विकत घेत प्रसार माध्यमांच्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. अदानी समूहाने या व्यवहाराची माहिती दिली आहे.

Adani Group takeover Quintillion Business Media
अदानींचा मीडिया क्षेत्रात विस्तार 
थोडं पण कामाचं
  • अदानी समूह करतोय मीडियामध्ये विस्तार
  • अदानींच्या एमजी मीडिया नेटवर्क्सने क्विंटिलियन बिझनेस मीडियाचा 49 टक्के हिस्सा विकत घेतला
  • ही बातमी येताच क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली

Adani Group takeover Quintillion Business Media : नवी दिल्ली : अदानी समूहाची (Adani group)मीडिया कंपनी असलेल्या एएमजी मीडिया नेटवर्क्सने (AMG Media Networks)  राघव बहल यांच्या क्विंटिलियन बिझनेस मीडियामध्ये (Quintillion Business Media)या डिजिटल बिझनेस न्यूज प्लॅटफॉर्मचा  49 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अदानी समूहाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 49 टक्के हिस्सा विकत घेत प्रसार माध्यमांच्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. अदानी समूहाने 13 मे 2022 रोजी एका दस्तऐवजाद्वारे शेअरधारकांना या व्यवहाराची माहिती दिली आहे. अदानींनी क्विंटिलियन मीडियाला विकत घेतल्याची बातमी येताच क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मीडिया कंपनीचे शेअर्स आज बीएसईवर 10% ने वाढून 327.55 रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी समूहाचा एक भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने या वर्षाच्या सुरुवातीला मीडिया उद्योगात प्रवेश करण्यासाठी क्विंटिलियन बिझनेस मीडियामध्ये हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली होती. (Adani Group buys 49% stake in Quintillion Business Media)

अधिक वाचा : Gautam Adani : अदानींचा मास्टर स्ट्रोक, अंबुजा-एसीसी विकत घेत बनले सिमेंट क्षेत्राचे राजे...

अदानी समूहाने दिली माहिती

अदानी समूहाने आपल्या दस्तऐवजात म्हटले आहे की, "आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की आमची पूर्ण मालकीची उपकंपनी AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (AMG Media) ने क्विंटिलियन मीडिया लिमिटेड (QML) आणि Quintillion Business Media Limited (QBML) च्या भागधारकांसोबत करार केला आहे. कंपनीने 13 मे 2022 रोजी QML मधील 49% शेअर्स विकत घेण्यासाठी करार केला आहे.

अधिक वाचा : SBI Interest rate : स्टेट बॅंकेने महिनाभरात दुसऱ्यांदा केली व्याजदरात वाढ, कर्जे झाली महाग, पाहा किती वाढणार तुमचा ईएमआय...

कंपनीचा व्यवसाय काय आहे

द क्विंटचे इंग्रजी आणि हिंदी पोर्टल, द क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडच्या मालकीचे आहेत. QBM ही एक न्यूज मीडिया कंपनी आहे. कंपनी तिच्या ब्लूमबर्गक्विंट प्लॅटफॉर्मद्वारे (Blommberg Quint) भारतीय अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय वित्त, कॉर्पोरेट कायदा आणि प्रशासन यावर आधारित बातम्या कव्हर करते. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये, क्विंट डिजिटलने क्विंटिलियन बिझनेस मीडियामधील 100% भागभांडवल संपादन करण्याची घोषणा केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला 1 मार्च 2022 रोजी, अदानी समूहाने घोषणा केली की ते QBM मध्‍ये एक छोटा हिस्सा विकत घेणार आहे. 

अधिक वाचा : PM Kisan : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!

अदानी समूहाने आता पायाभूत क्षेत्रात झेप घेतली आहे. त्यांनी पायाभूत क्षेत्रातील सर्वात मोठा सौदा केला आहे. अदानी समूहाने (Adani Group) आता सिमेंट क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. अदानी समूहाने स्विस कंपनी होल्सीम ग्रुपच्या (Holcim) सिमेंट कंपनी - अंबुजा सिमेंट्स लि. (Ambuja Cement) आणि एसीसी लि.चा (ACC Ltd) व्यवसाय विकत घेतला आहे. अदानींनी अंबूजा-एसीसी सिमेंटचा व्यवसाय तब्बल 10.5 अब्ज डॉलरना (80,000 कोटी रुपये) विकत घेतला आहे. या व्यवहारानंतर अदानी समूह आता सिमेंट व्यवसायील (Cement sector) सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने मोठा करार केला आहे. अदानी समूहाने होलसिम समूहाचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याची बोली जिंकली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी