Gautam Adani : अदानींचा मास्टर स्ट्रोक, अंबुजा-एसीसी विकत घेत बनले सिमेंट क्षेत्राचे राजे...

Ambuja-ACC take over : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांनी एक नवीन झेप घेतली आहे. त्यांनी पायाभूत क्षेत्रातील सर्वात मोठा सौदा केला आहे. अदानी समूहाने (Adani Group) आता सिमेंट क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. अदानी समूहाने स्विस कंपनी होल्सीम ग्रुपच्या (Holcim) सिमेंट कंपनी - अंबुजा सिमेंट्स लि. (Ambuja Cement) आणि एसीसी लि.चा (ACC Ltd) व्यवसाय विकत घेतला आहे. अदानींनी अंबूजा-एसीसी सिमेंटचा व्यवसाय तब्बल 10.5 अब्ज डॉलरना (80,000 कोटी रुपये) विकत घेतला आहे.

Ambuja-ACC cement takeover by Adani
अदानी समूहाचा सिमेंट क्षेत्रात विस्तार 
थोडं पण कामाचं
  • गौतम अदानींनी घेतली आणखी मोठी झेप
  • अदानी समूहाने विकत घेतली अंबूजा सिमेंट आणि एसीसी लि.
  • पायाभूत क्षेत्रातील सर्वात मोठी डील करत अदानी बनले सिमेंट सम्राट

Ambuja-ACC cement takeover by Adani : नवी दिल्ली  : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांनी एक नवीन झेप घेतली आहे. त्यांनी पायाभूत क्षेत्रातील सर्वात मोठा सौदा केला आहे. अदानी समूहाने (Adani Group) आता सिमेंट क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. अदानी समूहाने स्विस कंपनी होल्सीम ग्रुपच्या (Holcim) सिमेंट कंपनी - अंबुजा सिमेंट्स लि. (Ambuja Cement) आणि एसीसी लि.चा (ACC Ltd) व्यवसाय विकत घेतला आहे. अदानींनी अंबूजा-एसीसी सिमेंटचा व्यवसाय तब्बल 10.5 अब्ज डॉलरना (80,000 कोटी रुपये) विकत घेतला आहे. या व्यवहारानंतर अदानी समूह आता सिमेंट व्यवसायील (Cement sector) सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने मोठा करार केला आहे. अदानी समूहाने होलसिम समूहाचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याची बोली जिंकली आहे. आता अदानी समूहाच्या  ताब्यात होल्सीम ग्रुपच्या सिमेंट कंपनी- अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडचा व्यवसाय असेल. (Adani Group take overs Ambuja cement & ACC ltd)

अधिक वाचा : PM Kisan : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!

अदानींनी मारली बाजी

देशातील प्रसिद्ध सिमेंट ब्रँड अंबुजा आणि एसीसी विकत घेण्यासाठी दोन बड्या भारतीय व्यावसायिकांमध्ये शर्यत होती. अदानी समूहाव्यतिरिक्त सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू समूहही शर्यतीत होता. दुसरीकडे, अल्ट्राटेक सिमेंट तांत्रिक कारणांमुळे या शर्यतीत मागे पडली. तुमच्या माहितीसाठी होल्सीम ग्रुपच्या (Holcim) भारतात जवळपास 17 वर्षांपासून व्यवसाय करत आहे. Holcim ची ओळख भारतात प्रामुख्याने अंबुजा सिमेंट (Ambuja cement),एसीसी लि. (ACC Ltd)या ब्रॅंडद्वारे केली जाते. अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत.

अधिक वाचा : SBI Interest rate : स्टेट बॅंकेने महिनाभरात दुसऱ्यांदा केली व्याजदरात वाढ, कर्जे झाली महाग, पाहा किती वाढणार तुमचा ईएमआय...

अदानींचा सिमेंट क्षेत्रात विस्तार

अंबुजा सिमेंटचे बाजारमूल्य 70 हजार कोटींहून अधिक आहे. होल्सीम ग्रुपची (Holcim)या कंपनीत 63.19% हिस्सेदारी आहे, तर ACC चे बाजार भांडवल 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये स्विस कंपनीचा 54.53% हिस्सा आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंट इंडस्ट्रीज या नावाने सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला. एसीसी ताब्यात घेतल्यानंतर, अदानी सिमेंटची सिमेंट क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होणार आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 16 May 2022: सोनं घेता का कोणी सोनं! मोठी घसरणीसह पोचले 3 महिन्यांच्या नीचांकीवर, लग्नसराईत मोठी संधी

या डीलबद्दल बोलताना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, “भारताच्या विकासगाथेवर आमचा विश्वास अढळ आहे. भारतातील Holcim सिमेंट कंपन्यांना आमच्या ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिकशी जोडल्याने आम्ही जगातील सर्वात जास्त ग्रीन सिमेंट कंपनी बनू.

अदानी समूह आता भारताच्या 200 अब्ज डॉलर बाजारमूल्याच्या तीन सदस्यीय क्लबमध्ये सामील झाला आहे. अदानी ग्रुप व्यतिरिक्त या क्लबमध्ये रिलायन्स ग्रुप आणि टाटा ग्रुपचा समावेश आहे. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजे एकूण बाजारमूल्य आता 16 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी बंपर परतावा देऊन गुंतवणुकदारांनादेखील श्रीमंत केले आहे. देशातील टॉप-10 कंपन्यांमध्ये अदानी ग्रीनचा समावेश झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी