मुंबई मेट्रोला अदानीची `पॉवर` दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार

देशातील इतर शहरांप्रमाणे मुंबईतील वीज वितरणाची रचना ही जटिल प्रकारची आहे.

Adani Power will supply electricity to two lines of Mumbai Metro
अदानीची `पॉवर` दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार 
थोडं पण कामाचं
  • देशातील इतर शहरांप्रमाणे मुंबईतील वीज वितरणाची रचना ही जटिल प्रकारची आहे.
  • अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही कंपनी मुंबई उपनगरातील ३१ लाखांहून अधिक घरांना तसेच व्यावसायिकांना वीज पुरवते.
  • “गेल्या काही वर्षांत विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालय, मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांनी अदाणी इलेक्ट्रिसिटीला त्यांची प्रमुख पुरवठादार कंपनी म्हणून निवडले आहे.

मुंबई :  देशातील इतर शहरांप्रमाणे मुंबईतील वीज वितरणाची रचना ही जटिल प्रकारची आहे. महाराष्ट्रात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट (BEST) आणि राज्य वीज वितरण उपक्रम म्हणजेच महावितरण (MSEDCL) या दोन प्रमुख सार्वजनिक कंपन्यांसह - टाटा पॉवर आणि अदानीइलेक्ट्रिसिटी यासारखे अनेक वीज वितरक आहेत. (Adani Power will supply electricity to two lines of Mumbai Metro)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने अदानीइलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) सोबत त्यांच्या दोन मेट्रो लाईन - मेट्रो 2A (दहिसर-DN नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) सोबत भागीदारी करार केला आहे. याद्वारे दरवर्षी १२ कोटी युनिटपेक्षा अधिक वीज वापरली जाणार आहे.

अदानीइलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही कंपनी मुंबई उपनगरातील ३१ लाखांहून अधिक घरांना तसेच व्यावसायिकांना वीज पुरवते. विस्तृत अशा वीज वितरण जाळ्यामुळे ९९.९९५% विश्वासार्हतेसह अदानीइलेक्ट्रिसिटी ही ग्राहकांसाठी एक पसंतीची वीज पुरवठादार कंपनी बनली आहे. कंपनी स्पर्धकांच्या ८०% पेक्षा अधिक ग्राहकांनादेखील सेवा देते.

“गेल्या काही वर्षांत विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालय, मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांनी अदानीइलेक्ट्रिसिटीला त्यांची प्रमुख पुरवठादार कंपनी म्हणून निवडले आहे. याद्वारे समर्थित स्पर्धात्मक दरांमध्ये विश्वासार्ह आणि शाश्वत वीज पुरवठ्यामुळे तसेच ग्राहक-केंद्रित सेवा देत असल्यामुळे कंपनी अल्पावधीत लोकप्रिय बनली आहे”, असे अदानीइलेक्ट्रिसिटी (AEML) च्या प्रवक्त्याने सांगितले.

“आम्हाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबईच्या मेट्रो प्रवाशांना सेवा देताना आनंद होत आहे आणि वातावरणातील कार्बनचे अस्तित्व कमी करण्यातील साहाय्यासाठी आमचे शाश्वत उपाय हे नेहमीच भिन्न राहिले आहेत.”

गेल्या दोन ग्रीड आउटेज दरम्यान अदानीइलेक्ट्रिसिटीच्या विस्तृत अस्तित्वावरील विश्वासार्हतेचे खूप कौतुक झाले. व्यवसायाच्या पुनर्बांधणी दरम्यान काही महत्त्वाचे व्यवसाय विलग करण्यात आले. तर काही स्वतंत्र ठेवण्यात आले.

पर्यावरणपूरक विजेचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न कायम राखताना अदानीइलेक्ट्रिसिटी कंपनी वर्ष २०२७ पर्यंत ६०% पर्यंत हिस्सा विस्तारण्याच्या वचनबद्धतेसह अक्षय ऊर्जा स्त्रोताचा अधिकाधिक उपयोग करून मुंबईतील ३०% विजेची मागणी पूर्ण करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. उर्जेचे उद्दिष्ट पुन्हा एकदा परिभाषित होत असून यापुढे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास ख-या अर्थाने पर्यावरणपूरक, विश्वासार्ह आणि शाश्वत असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी