Adar Poonawalla to Musk : नवी दिल्ली : इलॉन मस्क (Elon Musk) आणि त्यांच्या कंपन्या या कायम चर्चेत असतात. टेस्लाच्या कार आणि टेस्लाचे कारखाने याबद्दलदेखील बोलले जात असते. भारतात टेस्ला कार (Tesla Car) येण्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र टेस्लाचे भारतात उत्पादन नसल्याने या कार महाग असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India)सीईओ आणि सर्वेसर्वा अदर पूनावाला (Adar Poonawalla)यांनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना भारतात टेस्ला कार बनवण्याचे आवाहन केले आहे. टेस्ला कारचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी भारतात गुंतवणूक करण्याची सूचना अदर पूनावाला यांनी इलॉन मस्क यांना केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अदर पूनावाला यांनी हे मस्कच्या ट्विटर (Twitter take Over by Musk) विकत घेण्यासंदर्भात म्हटले आहे. पूनावालांनी मस्क यांनी म्हटले आहे की जर त्यांचा 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर विकत घेण्याचा व्यवहार पूर्ण झाला नाही तर त्यांनी भारतात टेस्ला कारचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करावे. (Adar Poonawalla tweets & urge Elon Musk to start production of Tesla Cars in India)
अधिक वाचा : Cheapest Home Loan | कमी व्याजदरात होम लोन हवंय? मग या बँका देतायेत सर्वात कमी व्याजदरात होम लोन
पूनावाला यांनी सांगितले की जर मस्कने ट्विटर विकत घेतले नाही, तर त्यांनी टेस्ला कारच्या उच्च दर्जाच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी भारतात भांडवल गुंतवण्याचा विचार केला पाहिजे. पूनावाला यांनी मस्कला आश्वासनही दिले की टेस्लाच्या सीईओची ही आतापर्यंतची सर्वोत्तम गुंतवणूक असेल. "अहो इलॉन मस्क जर तुम्ही Twitter विकत घेतले नाही तर, त्यातील काही भांडवल भारतात टेस्ला कारच्या उच्च-गुणवत्तेच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी गुंतवा. मी तुम्हाला खात्री देतो की ही तुमची सर्वोत्तम गुंतवणूक असेल. ” अशा आशयाचे पूनावाला यांनी ट्विट केले.
अधिक वाचा : Mother's Day 2022: या 'मदर्स डे' ला, आईला द्या या 5 'अर्थ'पूर्ण भेट, तिचे म्हातारपण होईल सुखाचे...
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) ने गुरुवारी दाखल केलेल्या इलॉन मस्कच्या ट्विटर बाय-इनला इतर अनेक प्रमुख नावांसह आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्स्चेंज असलेल्या बायनन्सद्वारे निधी दिला गेला असल्याचे दर्शवले आहे.
मस्क यांची मुख्य कंपनी टेस्ला ही इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करते. त्याचबरोबर मस्क यांच्या बोरिंग कंपनी आणि स्पेसएक्स या कंपन्यादेखील जगातील आघाडीच्या कंपन्या आहेत. मस्कच यांचे नेतृत्त्व करतात. फोर्ब्स मासिकानुसार इलॉन मस्क हेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. अलीकडेच इलॉन मस्कने 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी करार केला होता. अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर ही सार्वजनिक सोशल मीडिया कंपनी पूर्णपणे खाजगी असेल अशी घोषणा ट्विटरने केली होती.
मस्क सध्या 44 अब्ज डॉलरमध्ये Twitter चे संपादन करण्यासाठी गुंतवणुकदारांशी व्यवहार करत आहे. ट्विटरला इलॉन मस्क यांनी 54.20 डॉलर प्रति शेअरची ऑफर दिलेली आहे. लवकरच हा व्यवहार पूर्ण होईल अशी मस्कची अपेक्षा आहे.
चांगपेंग झाओ-नेतृत्वाखालील Binance ने मस्कच्या Twitter च्या संपादनात भाग घेतला असून 50 कोटी डॉलरचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ट्विटर विकत घेण्याच्या डीलमध्ये सहभागी होणारी इतर प्रमुख नावे म्हणजे सेक्वॉइया कॅपिटल, फिडेलिटी मॅनेजमेंट, कतार होल्डिंग आणि इतरही काही बडे गुंतवणुकदार यात आहेत. ेस्लाचे बोर्ड सदस्य आणि मस्कचे जवळचे मित्र असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या लॅरी एलिसन, यांनीदेखील या व्यवहारासाठी 1 अब्ज डॉलर देण्याचे वचन दिले आहे.
याव्यतिरिक्त इतर अनेक कंपन्या किंवा गुंतवणुकदारांनी मस्कच्या या ट्विटर डीलमध्ये पैसा लावला आहे. Sequoia ने 80 कोटी डॉलर, तर Fidelity ने 316,139,386 डॉलर, SEC फाइलिंगमध्ये दाखवले. ए.एम.मॅनेजमेंट अँड कन्सल्टिंग, मार्क अँड्रीसेन आणि बेन हॉरोविट्झ यांनी स्थापन केलेल्या एंड्रीसेन होरोविट्झ (a16z), ब्रुकफील्ड, हनीकॉम्ब अॅसेट मॅनेजमेंट एलपी, लिटानी व्हेंचर्स, इत्यादी सारखे गुंतवणुकदारांनीदेखील या व्यवहारात सहभाग घेतला आहे.