आता ‘ही’ बँक होणार बंद, तुमचं खातं असेल तर लगेच काढा पैसे

काम-धंदा
Updated Nov 20, 2019 | 18:32 IST | Economic Times

नोटाबंदीनंतर सुरू झालेल्या नव्या जमानाच्या बँकांपैकी एक असलेली आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक लिमिटेड आता बंद होतेय. जाणून घ्या जर आपले पैसे अडकले असतील तर ते कसे परत मिळवायचे.

Payment Bank
आता ‘ही’ बँक होणार बंद, तुमचं खातं असेल तर लगेच काढा पैसे  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक लिमिटेड बंद करण्यास परवानगी
  • जुलै महिन्यात पेमेंट बँक बंद करण्याची केली होती घोषणा
  • एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट या पेमेंट बँक आता ग्राहकांच्या सेवेत कार्यरत

मुंबई: वोडाफोननं एम पैसा बंद केल्यानंतर आता वोडाफोन-आयडिया टेलिकॉमनं आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेड बंद करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता. पेमेंट बँक सुरू केल्यानंतर अवघ्या १७ महिन्यांमध्ये वोडाफोन-आयडियानं हा निर्णय घेतला होता. इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, आता रिझर्व्ह बँकेने आयडिया पेमेंट बँकेला आपला कारभार संपवण्यासाठीची परवानगी दिली आहे.

यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने आपला कारभार संपवण्याची घोषणा केली होती. काही आकस्मिक घटनांमुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे, असं या बँकेनं म्हटलं होतं.

आयडिया सेल्युलरची ४९ टक्के भागीदारी

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक आयडिया सेल्युलर आणि आदित्य बिर्ला नूवो लिमिटेडचं ज्वॉईंट वेंचर आहे. यात आदित्य बिर्ला नूवो लिमिटेडचे ५१ टक्के आणि आयडिया सेल्युलरचे ४९ टक्के शेअर्स आहेत. सध्या देशात सुरू असलेल्या एकूण सात पेमेंट बँकांपैकी एक बँक आहे. आता ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट यासारख्या प्रमुख कंपन्यांची पेमेंट बँक सेवा उपलब्ध असेल.

ग्राहकांना करावं लागेल हे काम

आदित्य बिर्ला पेमेंट बँक लिमिटेडनं आपल्या ग्राहकांना २० जुलै रोजी मेसेज करून ही माहिती दिली होती. ग्राहकांना आपले जमा असलेले पैसे परत केले जातील. आदित्य बिर्ला पेमेंट्स बँक आरबीआयद्वारे जारी केलेल्या नियमांनुसार, काम करत राहणार होते. जेणेकरून ज्या ग्राहकांचे पैसे बँकेत आहेत ते पैसे काढू शकतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बँकेजवळ सध्या जवळपास २० कोटी रुपये कॅश जमा होती. पण अखेर आता पेमेंट बँक आपलं कामकाज बंद करणार आहे.

२० जुलैला ग्राहकांना मिळाला होता हा मेसेज

बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या मॅसेजमध्ये लिहिलं होतं, ग्राहक आपले पैसे इतर अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करू शकतात. यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळील आदित्य बिर्ला पेमेंट बँकेच्या बँकिंग पॉईंटवर जात त्यांची मदत घ्यावी. २६ जुलैनंतर ग्राहक आदित्य बिर्ला पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये पैसे जमा करू शकणार नाही. याशिवाय 18002092265 वर फोन करून याबाबत अधिक माहिती मिळेल किंवा vcare4u@adityabirla।bank वर सुद्धा ग्राहक ई-मेल करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी