MHA IB SA, MTS Admit Card 2023: जर तुम्ही गुप्तचर विभागातील SA किंवा MTS पदांसाठी अर्ज केला असेल आणि परीक्षेची तयारी करत असाल तर हे महत्त्वाचे अपडेट फक्त तुमच्यासाठी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गुप्तचर विभागाद्वारे इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या एकूण 1675 पदांच्या भरतीसाठी 28 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते. यानंतर विहित निवड प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षा 23 आणि 24 मार्च रोजी होणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत.
अधिक वाचा : जास्त लिंबू पाणी पिणं आहे धोकेदायक
ज्या उमेदवारांनी MHA IB भरतीसाठी अर्ज केला आहे ते त्यांचे IB SA प्रवेशपत्र 2023 किंवा IB MTS प्रवेशपत्र 2023 मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. mha.gov.in परंतु तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकवरून सक्रिय लिंक डाउनलोड करू शकता. यासाठी उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग-इन करावे लागेल. त्यानंतर दिलेल्या लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. उमेदवार याचे प्रिंट ऑऊट घेऊ शकता तसेच त्याला सेव्ह करून ठेवू शकतात.
अधिक वाचा : केसांसाठी कडुलिंब आहे फायदेशीर, कोंड्याची समस्या होईल दूर
MHA IB SA, MTS Admit Card 2023: 23 आणि 24 मार्च रोजी परीक्षा होणार
याआधी इंटेलिजन्स ब्युरोने एसए आणि एमटीएस पदांच्या भरतीसाठी आयोजित केलेल्या टियर 1 परीक्षेची तारीख जाहीर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात 23 आणि 24 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा फक्त 100 गुणांची असेल आणि 1/4 गुणांची नकारात्मक मार्किंग असेल. तर, उत्तर न मिळालेल्या प्रश्नासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. टियर 1 मधील कामगिरीच्या आधारावर, घोषित केलेल्या रिक्त पदांच्या 10 पट उमेदवारांना टियर 2 मध्ये उपस्थित राहण्यासाठी बोलवलं जाईल.