Ads for online betting : ऑनलाइन सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात केंद्र सरकारच्या सूचना जारी

online betting : केंद्र सरकारने ऑनलाइन सट्टेबाजीविरोधात (online betting)पाऊल उचलत सोमवारी (13 जून) सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांना ऑनलाइन सट्टेबाजी चालवणाऱ्यांच्या जाहिराती (ads promoting online betting) देण्यापासून परावृत्त करण्यासाठी एक सूचना जारी केली आहे.

fantasy sports market
देशातील ऑनलाइन सट्टेबाजी 
थोडं पण कामाचं
  • ऑनलाइन सट्टेबाजी विरोधात केंद्र सरकारने उचलली पावले
  • प्रसारमाध्यमांमधून ऑनलाइन सट्टेबाजी संदर्भातील जाहिरातींना लगाम
  • देशातील फॅन्टसी स्पोर्ट्स मार्केट 34,000 कोटी रुपयांचे

Online betting : नवी दिल्ली: केंद्र सरकारने ऑनलाइन सट्टेबाजीविरोधात (online betting)पाऊल उचलत सोमवारी (13 जून) सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांना ऑनलाइन सट्टेबाजी चालवणाऱ्यांच्या जाहिराती (ads promoting online betting) देण्यापासून परावृत्त करण्यासाठी एक सूचना जारी केली आहे. अब्जावधी डॉलरच्या या ऑनलाइन सट्टेबाजी उद्योगावर अंकुश ठेवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. (Advisory against ads promoting online betting issued by Central Government to control the betting platforms)

सरकारची सूचना

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, "देशाच्या बहुतेक भागांमध्ये बेकायदेशीरपणे सट्टेबाजी आणि जुगार खेळणे, ग्राहकांसाठी, विशेषत: तरुण आणि मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक धोका आहे." अलीकडे अनेक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आणि ऑनलाइन मीडियावर दिसणार्‍या ऑनलाइन बेटिंग वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्मच्या अनेक जाहिरातींच्या प्रकाशात येताना दिसत आहेत.

अधिक वाचा : IPL Media Rights: क्रिकेट आणि पैशांची खाण...बीसीसीआयच्या तिजोरीत 46,000 कोटींची भर...आयपीएल लिलाव सुरूच

“ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि त्या ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रेग्युलेशन कायदा, 1995 अंतर्गत जाहिरात संहिता आणि प्रेस कौन्सिल कायदा, 1978 अंतर्गत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या पत्रकारितेच्या वर्तनाच्या निकषांनुसार दिलेल्या जाहिरातींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत," असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

सरकारने पुढे ऑनलाइन जाहिरात मध्यस्थ आणि प्रकाशकांसह ऑनलाइन आणि सोशल मीडियाला अशा जाहिराती भारतात प्रदर्शित करू नयेत किंवा भारतीय प्रेक्षकांसाठी अशा जाहिरातींना लक्ष्य करू नये असा सल्ला दिला आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 June 2022: सोन्याच्या भावात मोठी घसरण, मजबूत डॉलर आणि मंदीच्या भीतीने सराफा बाजारावर दबाव

याआधीदेखील खासगी चॅनेला दिल्या होत्या सूचना

2020 मध्ये, सरकारने खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेलना ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींवर अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) च्या नियमांचे पालन करण्यासाठी एक सूचना जारी केली होती. ज्यात ऑनलाइन गेमिंगच्या प्रिंट आणि ऑडिओ-व्हिज्युअल जाहिरातींसाठी काय करावे आणि काय करून नये यासंदर्भातील सूचना येता देण्यात आल्या होत्या.

अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की नव्या सूचनांमुळे काल्पनिक क्रीडा कंपन्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो, ज्या ऑनलाइन जुगाराला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स (FIFS) आणि डेलॉइटने या वर्षीच्या मार्चमध्ये प्रसिद्ध केलेल्या उद्योग संघटनेच्या अहवालानुसार, भारताचा फॅन्टसी स्पोर्ट्स बाजार 2025 या आर्थिक वर्षापर्यंत 1.65 लाख कोटी रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे . या क्षेत्राचा वार्षिक वृद्धी दर (CAGR) 38 टक्के आहे. सध्या फॅन्टसी स्पोर्ट्स मार्केट 34,000 कोटी रुपयांचे आहे.

अधिक वाचा : NPS: एनपीएसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ही जबरदस्त सुविधा, विस्ताराने जाणून घ्या

सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून ऑनलाइन सट्टेबाजीच्या व्यवसायाने प्रचंड झेप घेतली आहे. दरवर्षी यातून हजारो कोटींची उलाढाल होते आहे. या व्यवसायाचा विपरित परिणाम मुख्यत: तरुणपिढीवर होतो आहे. त्यातच हा सर्व प्रकार ऑनलाइन स्वरुपात असल्यामुळे त्याला आळा घालणे किंवा त्यावर अंकुश ठेवणे कठीण जाते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी