TATA IPO: कमाईची मोठी संधी! 18 वर्षात पहिल्यांदाच आयपीओ आणतोय टाटा समूह, तारीख आणि तपशील जाणून घ्या

Tata Group IPO : शेअर बाजारात (Share Market) अनेक कंपन्यांचे आयपीओ येत असतात. शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध करण्यासाठी किंवा नोंदणीकृत करण्यासाठी आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO)आणला जात असतो. यातून अनेकजण चांगली कमाईदेखील करतात. त्यातच हा आयपीओ जर टाटा समूहातील (Tata Group)एखाद्या कंपनीचा असेल तर मग विचारूच नका. आता आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Tata Group IPO
टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध करण्यासाठी किंवा नोंदणीकृत करण्यासाठी आयपीओ आणला जातो
  • टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ आणते आहे
  • यापूर्वी 2004 मध्ये टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसचा आयपीओ लॉन्च करण्यात आला होता

TATA Company IPO : मुंबई : शेअर बाजारात (Share Market) अनेक कंपन्यांचे आयपीओ येत असतात. शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध करण्यासाठी किंवा नोंदणीकृत करण्यासाठी आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO)आणला जात असतो. यातून अनेकजण चांगली कमाईदेखील करतात. त्यातच हा आयपीओ जर टाटा समूहातील (Tata Group)एखाद्या कंपनीचा असेल तर मग विचारूच नका. आता आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ आणते आहे. सूत्रांकडून अशी माहिती समोर येते आहे की जर सर्व काही ठीक झाले तर चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस टाटा समूह  आपल्या कंपनीचा आयपीओ बाजारात आणू शकतो. विशेष म्हणजे हा आयपीओ टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies) या कंपनीचा असणार आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सचीच टाटा टेक्नॉलॉजीज ही उपकंपनी आहे. (After 18 years Tata company to launch IPO, check details)

अधिक वाचा : Multibagger Stock : या भन्नाट शेअरने केले 1 लाखाचे 8 कोटी, गुंतवणुकदारांची तुफानी कमाई

18 वर्षात प्रथमच टाटांचा IPO येणार 

टाटा समूह किरकोळ गुंतवणुकदारांना 18 वर्षांत प्रथमच IPO द्वारे शेअर्स खरेदी करण्याची संधी देईल. आज बाजार भांडवलाच्या बाबतीत TCS ही देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. यापूर्वी 2004 मध्ये टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसचा आयपीओ लॉन्च करण्यात आला होता आणि त्याचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.

अधिक वाचा : Multibagger Stock : IPO असावा तर असा...102 रुपयांवरून 7200 रुपयांवर पोचला हा शेअर, एका वर्षात 70 पटीने वाढ... 

टाटा टेक्नॉलॉजीजचा इतिहास

तुमच्या माहितीसाठी टाटा मोटर्सची टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. टाटा टेक ही कंपनी ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, इंडस्ट्रियल मशिनरी आणि इंडस्ट्री या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. ऑटोनॉमस, कनेक्टेड, इलेक्ट्रिफिकेशन आणि शेअर्ड मोबिलिटी आणि डिजिटलमधील गुंतवणुकीमुळे ते वेगाने वाढत आहे. म्हणजेच बाजारात त्याची चांगली पकड आहे.

अधिक वाचा : एलॉन मस्कने रद्द केले ट्विटर डील, ट्विटर मस्क विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत

कंपनीचा एकूण महसूल किती आहे?

विशेष म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीजचे मुख्यालय पुण्यात आहे. तसेच त्याची जगभरात 18 वितरण केंद्रे आणि 9300 कर्मचारी आहेत. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात टाटा टेकचा महसूल 3529.6 कोटी रुपये होता आणि ही एक अत्यंत नफ्यातील कंपनी आहे.

टाटा समूहाची कंपनी म्हटल्यावर टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयीपओवर गुंतवणुकदारांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे. त्यातच कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली आहे. टाटा मोटर्सची ही उपकंपनी असल्यामुळे टाटा मोटर्सच्या नावाचादेखील कंपनीला फायदा होणार आहे. अलीकडच्या काळात टाटा मोटर्सनेदेखील चांगली आर्थिक कामगिरी करून दाखवली आहे. टाटांची नवी वाहने आणि खास करून इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहेत.

खरेतर, सध्याच्या बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro)या आघाडीच्या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. TCS आणि Infosys चे समभाग त्यांच्या संबंधित 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोचले होते. मात्र जाणकारांना यात गुंतवणुकीची संधी दिसते आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी