5G Services : 4G सिम 5G मध्ये चालेल की नवीन सिम कार्ड लागेल... पाहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

5G Services : आज भारतात अधिकृतपणे 5G सेवा लाँच करण्यात आली आहे. येत्या काही वर्षात संपूर्ण भारतात 5G सेवा मिळण्यास सुरुवात होईल. भारतातील 5G ​​वेगवान इंटरनेट स्पीड, कमी विलंबता, तसेच विश्वसनीय कनेक्टिव्हिटी यासारखी वैशिष्ट्ये ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. मात्र ही नवी आधुनिक सेवा सुरू झाल्यानंतर जुन्या 4G सेवा आणि त्याच्याशी निगडीत सिम कार्ड, स्मार्टफोन इत्यांदीचे काय होणार अशा शंका अनेकांना आहेत. त्याबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.

5G services in India
5G सेवांची सुरूवात  
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतात अधिकृतपणे 5G सेवा लाँच केली
  • आघाडीच्या दूरसंचार कंपन्या 5G सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.
  • आता 4G सिमकार्डचे काय करायचे यासारख्या अनेक शंका सर्वसामान्यांसमोर आहेत

What after 5G Services launched : नवी दिल्ली : ज्याची वाट सर्वजण अनेक दिवसांपासून पाहत होते त्या 5G सेवेची सुरूवात अखेर आज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज भारतात अधिकृतपणे 5G सेवा लाँच (5G launch in India) केली आहे. येत्या काही वर्षात संपूर्ण भारतात 5G सेवा मिळण्यास सुरुवात होईल. देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या 5G सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. रिलायन्स जिओसह एअरटेलने सांगितले की, लवकरच 5G सेवा देशभरात सुरू केली जाईल. भारतातील 5G ​​वेगवान इंटरनेट स्पीड, कमी विलंबता, तसेच विश्वसनीय कनेक्टिव्हिटी यासारखी वैशिष्ट्ये ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. अशा परिस्थितीत आता 4G सिमकार्डचे काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडत असेल? 4G सिम कार्ड काढून टाकण्याची आणि 5G पूर्णपणे स्वीकारण्याची वेळ आली आहे का? आणि  जुन्या 4G सिम कार्ड  किंवा स्मार्टफोन्सचे काय? त्यांना फेकून देण्याची आणि 5G कनेक्टिव्हिटीवर स्विच होण्याची वेळ आली आहे का? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनातही निर्माण होत असतील. त्यामुळे तुमचा गोंधळ उडाला असेल. यासर्व शंकांचे निरसन करून घेण्यासाठी ही माहिती जाणून घ्या. (After 5G launched, what to do with 4G SIM and smartphones)

अधिक वाचा : LPG Price: एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत

5G सेवा सुरू झाल्यानंतर 4G सिमकार्डचे काय करायचे? 

- नाही, आता काही वर्षे अजिबात नाही! 5G सेवा सुरू झाल्यानंतरदेखील 4G हा LTE आहे आणि तो भारताच्या दूरसंचार पायाभूत सुविधांचा कणा राहील. पुढील दोन वर्षांत, Airtel आणि Jio सारख्या दूरसंचार कंपन्या त्यांचे 5G नेटवर्क शक्य तितके वाढवतील. तोपर्यंत, तुमचे 4G सिम कार्ड आज आहे तसेच काम करत राहील.

-  4G सेवा ज्या रितीने विश्वसनीयरित्या आणि सहज उपलब्ध आहे तसे 5G सेवेच्या सुरूवातीच्या काळात होणार नाही. 5G फक्त काही पॉकेट्समध्ये उपलब्ध असेल, तेही काही शहरांमध्ये. त्यामुळे, तुम्हाला फक्त काही क्षेत्रांमध्ये 5G गती मिळेल आणि उर्वरित क्षेत्रांसाठी 4G वर काम अवलंबून असेल.

अधिक वाचा : Business Idea : लगेच सुरू करा हा बंपर कमाईचा सोप्पा व्यवसाय! सरकार देतंय सब्सिडी...दर महिन्याला लाखोंची कमाई

एअरटेलचे म्हणणे आहे की त्यांचे 4G सिम कार्ड वापरणारे ग्राहक त्यांच्या क्षेत्रात एकदा सेवा सक्रिय झाल्यानंतर सिम कार्ड न बदलता 5G सेवा वापरू शकतील. म्हणूनच तुम्ही तुमचे 4G सिम कार्ड अजिबात फेकून देऊ नका. जिओने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

भारतात 5G सेवांची किंमत किती असेल हे अद्याप स्पष्ट नाही. दूरसंचार कंपन्यांनी सूचित केले आहे की भारतातील 4G सेवांपेक्षा 5G किंचित जास्त महाग आहे. म्हणूनच 4G हा बहुतेक लोकांसाठी अधिक परवडणारा पर्याय राहू शकतो. बर्‍याच ग्राहकांसाठी, 4G LTE परवडणार्‍या किंमतीत पुरेसा डेटा स्पीड प्रदान करणे सुरू ठेवेल. तर 5G हायस्पीड शोधणार्‍या प्रो ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकेल.

अधिक वाचा : महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 21 हजार 403 कोटींचे GST कलेक्शन

4G स्मार्टफोनचे काय होणार? 

- तुम्ही 4G स्मार्टफोन वापरत असल्यास, 5G सेवा मिळवण्यासाठी तो फेकून देण्याची गरज नाही. किमान पुढील काही वर्षांसाठी अजिबात नाही. 4G LTE ऑनलाइन जाण्याचा प्राथमिक मार्ग असू शकतो. त्यामुळे तुमचा 4G स्मार्टफोन आज आहे तसाच काम करत राहील.

- 5G सेवा पूर्णपणे सुरू झाल्यानंतरदेखील, तुमचा 4G फोन आणि त्याचे 4G सिम कार्ड चांगले काम करत राहतील. तुम्ही तुमच्या जुन्या फोनचा वापर करू शकाल. तुमच्या कारसाठी GPS नेव्हिगेशन युनिट किंवा तुमच्या मुलासाठी पहिला स्मार्टफोन अशा गोष्टींसाठी तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन वापरू शकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी