7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, या 3 भत्त्यात होणार वाढ!

Central Employees Allowances : तुम्ही केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरी करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला होता. यानंतर अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यापासून वाढीव भत्त्याची थकबाकी देण्याची घोषणा केली. आता सरकार आणखी तीन भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा विचार करते आहे.

7th Pay Commission update
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तीन भत्त्यांमध्ये होणार वाढ 
थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ
  • कर्मचाऱ्यांचे आणखी तीन भत्ते वाढविण्याचा सरकार विचार करते आहे
  • भत्त्यांमधील वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार

7th Pay Commission Latest News :  नवी दिल्ली : तुम्ही केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरी करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला होता. यानंतर अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यापासून वाढीव भत्त्याची थकबाकी देण्याची घोषणा केली. महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी अपेक्षित होती.  (After DA hike, central employees to get hike in 3 allowance )

अधिक वाचा : PM Kisan eKYC | पीएम किसानच्या 11 व्या हप्त्यासंदर्भात मोठे अपडेट, ही सुविधा सुरू

कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ 

याच क्रमाने आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांचे आणखी तीन भत्ते वाढविण्याचा सरकार विचार करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी वाढ होणार आहे.

HRA वाढ शक्य (House Rent Allowance)

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागाई भत्ता वाढल्यानंतर घरभाडे भत्ता (HRA) वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने एचआरए वाढवण्याचा निर्णय घेतल्यास 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.

अधिक वाचा : LIC IPO Date | इंतजार खत्म ! 4 मे ला येणार एलआयसीचा आयपीओ... सोडू नका सरकारच्या दुभत्या गाईकडून कमाईची मोठी संधी...7 महत्त्वाच्या गोष्टी

शहर भत्ता वाढणार (City Allowance)

सरकारने महागाई भत्त्यासह एचआरए वाढवल्यास शहर भत्त्यावरदेखील (City Allowance)  परिणाम होईल. वास्तविक, डीए वाढल्याने हा भत्ता वाढण्याची अपेक्षा वाढली आहे.

प्रवास भत्त्यामध्ये वाढ (Travel Allowance)

महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता (Travel Allowance) वाढणार आहे. प्रत्यक्षात डीए वाढल्यानंतर टीए आणि सीए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक वाचा : Jeff Bezos on Musk | इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर, जेफ बेझॉस यांना चीनबद्दल आहे मोठी शंका...पाहा काय आहे प्रकरण

डीए वाढीत अडचण

सरकारने गेल्या काही दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central employees) महागाई भत्त्यात (DA) वाढीची भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांना दिलासा देत महागाई भत्त्यात वाढीच्या (DA Hike)या घोषणेसह सरकारने डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला आहे. डीएची थकबाकीही अर्थ मंत्रालयाने मंजूर केली होती. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी खूश झाले होते. मात्र आता हा आनंद फक्त नियमित केंद्रीय कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित नाही. केंद्र सरकारच्या पेन्शनर्सनादेखील दिलासा देत त्यांच्या पेन्शनमध्ये आता वाढ होण्याची बातमी होती. आता जुलैमध्ये डीए वाढण्याची प्रतीक्षा कर्मचाऱ्यांना आहे. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वर्षातून दोनदा सुधारित केला जातो. पहिली पुनरावृत्ती जानेवारी ते जून आहे. दुसरा जुलै ते डिसेंबर. मार्चमध्ये पहिल्या डीए रिव्हिजनची घोषणा करण्यात आली आहे. जुलैमध्ये त्यात पुन्हा सुधारणा केली जाईल. दरम्यान, महागाई भत्त्याची आकडेवारी येऊ लागली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीवरून असे दिसते की पुढील महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. आत्ताच जानेवारी आणि फेब्रुवारीचा AICPI निर्देशांक आला आहे. डिसेंबर 2021 च्या तुलनेत यामध्ये घसरण दिसून येते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी