PM Awas Yojana | जेव्हा पीएम आवास योजनेअंतर्गत घर मिळाल्यावर एका गरीब व्यक्तीने पंतप्रधानांना लिहिलं पत्र...

Affordable housing : सर्वसामान्यांची समस्या लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम आवास योजना (PM Awas Yojana) लागू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक गरजूंना घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते आहे. सर्वसामान्य माणसाचे जेव्हा घराचे स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. असाच एक प्रसंग घडला आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एक गरीब व्यक्तीच्या बाबतीत. पीएम आवास योजनेअंतर्गत घर मिळाल्यावर या माणसाने पंतप्रधानांच पत्र लिहिले होते.

PM Awas Yojana
पीएम आवास योजना 
थोडं पण कामाचं
  • अनेकांना घर बांधणे किंवा विकत घेणे शक्य होत नाही, यासाठी पीएम आवास योजना लागू
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये प्रधानमंत्री शहरी आवास योजना आणि 2016 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू केली
  • मध्य प्रदेशातील एका गरीब व्यक्तीने घर मिळाल्यावर पंतप्रधानांना लिहिले पत्र

PM Awas Yojana update : नवी दिल्ली : प्रत्येक माणसाचेच स्वत:चे घर (Home)असावे असे स्वप्न असते. मात्र अनेकांना घर बांधणे किंवा विकत घेणे शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम आवास योजना (PM Awas Yojana) लागू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक गरजूंना घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते आहे. सर्वसामान्य माणसाचे जेव्हा घराचे स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. असाच एक प्रसंग घडला आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एक गरीब व्यक्तीच्या बाबतीत. पीएम आवास योजनेअंतर्गत घर मिळाल्यावर या माणसाने पंतप्रधानांच पत्र लिहिले होते. पंतप्रधान मोदींनीदेखील या पत्राला प्रतिसाद दिला आहे. (After getting home through PM Awas Yojana, a poor man writes letter to PM Modi)

अधिक वाचा : Real Estate update | जाणून घ्या, कोणती शहरे घर खरेदीसाठी आहेत सर्वात स्वस्त आणि महाग

घर मिळाल्याचा झाला आनंद, पंतप्रधानांना दिले धन्यवाद

पीएम आवास योजनेचा लाभ मिळत मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सुधीर कुमार जैन नावाच्या व्यक्तीला घर मिळाले. यामुळे आनंद होत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिले. सुधीर कुमारने गृहनिर्माण योजनेसाठी पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. पत्राला उत्तर देताना पीएम मोदींनी गरीब व्यक्तीचे घर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे. सागर जिल्ह्यातील सुधीर कुमार जैन नावाच्या तरुणाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सांगितले की, तो भाड्याच्या घरात राहतो आणि अनेक वेळा घर बदलले आहे. या परिस्थितीच्या वेदना त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, प्रधानमंत्री आवास योजना बेघर गरीब कुटुंबांसाठी वरदान आहे.

अधिक वाचा : Unemployment Allowance | 'हे' सरकार बेरोजगार तरुणांना दर महिन्याला देते 7,500 रुपये, असा करा अर्ज

पंतप्रधानांनी दिला पत्राला प्रतिसाद

सुधीर जैन यांच्या पत्राला उत्तर देताना, घर मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटची रचना नसते. आपल्या भावना आणि आकांक्षाही त्याच्याशी निगडित आहेत आणि घराची सीमा भिंत केवळ सुरक्षाच देत नाही, तर आपल्याला एका चांगल्या भविष्याचीही खात्रीही देते. पत्राला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, “प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तुमचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. या यशानंतर तुमचे समाधान पत्रातील तुमच्या शब्दांतून जाणवते. हे घर तुमच्या कुटुंबासाठी सन्माननीय जीवन आणि तुमच्या दोन्ही मुलांसाठी चांगल्या भविष्यासाठी नवीन पायासारखे आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे वर्णन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या योजनेतून आतापर्यंत कोट्यवधी लाभार्थ्यांना पक्की घरे मिळाली आहेत. लाभार्थ्यांच्या जीवनातील हे 'अविस्मरणीय क्षण' त्यांना 'अथक आणि अविरतपणे देशसेवेत कार्यरत राहण्याची' प्रेरणा देतात. पीएम मोदी म्हणाले की, सरकार लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

अधिक वाचा : PM Kisan update | पीएम किसान योजनेत तुम्ही ही चूक तर केली नाही ना? नोटीस पाठवून केली जातेय वसुली!

केंद्र सरकारची योजना

केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू केली तर जून 2015 मध्ये प्रधानमंत्री शहरी आवास योजना सुरू करण्यात आली. 2022 पर्यंत सर्व बेघरांना मुलभूत सुविधांसह घरे उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अर्ज कसा करायचा हे माहित आहे?

तुम्ही बेघर असाल आणि तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पक्के घर घ्यायचे असेल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. सर्वप्रथम, तुम्ही PMAY च्या अधिकृत वेबसाइट http://pmaymis.gov.in वर जा. त्यानंतर होम पेजवर Citizen Assessment किंवा Citizen Assessment वर क्लिक करा. अर्जदार श्रेणी निवडा. यानंतर एक स्वतंत्र पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक, उत्पन्नासह वैयक्तिक तपशील भरण्यास सांगितले जाईल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका, सत्यापित करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे पंतप्रधान आवास योजनेसाठी तुमचा अर्ज पूर्ण होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी