Share Market : भारतापाठोपाठ अमेरिकेच्या बाजाराच्या गटांगळ्या, अमेझॉनपासून ते टेस्लापर्यंतच्या शेअर्सने टेकले गुडघे...गुंतवणुकदार चिंताग्रस्त

Equity Market : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहे. त्यात भर घालत आता अमेरिकन शेअर बाजारातही (US Share Market)विक्रमी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाईच्या भीतीने अमेरिकन शेअर बाजार रेंगाळताना दिसत होता. अमेरिकन बाजाराचा निर्देशांक S&P 500 - सुरुवातीच्या सत्रात 3% घसरण नोंदवत व्यवहार करत होता.

Share market crash
शेअर बाजार कोसळला 
थोडं पण कामाचं
  • भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या गटांगळ्या
  • अमेरिकन शेअर बाजारात जोरदार विक्री सुरू, बाजारात घसरला
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याने बाजारांमध्ये घसरण, गुंतवणुकदार चिंताग्रस्त

Share Market Crash :न्यूयॉर्क : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहे. त्यात भर घालत आता अमेरिकन शेअर बाजारातही (US Share Market)विक्रमी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाईच्या  भीतीने अमेरिकन शेअर बाजार रेंगाळताना दिसत होता. अमेरिकन बाजाराचा निर्देशांक S&P 500 - सुरुवातीच्या सत्रात 3% घसरण नोंदवत व्यवहार करत होता. सकाळच्या सत्र सर्व 11 प्रमुख S&P क्षेत्र घसरले. बाजारमूल्याच्या दृष्टीने बलाढ्य असलेल्या अमॅझॉन (Amazon), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), अॅपल(Apple) आणि टेस्ला (Tesla)सारख्या कंपन्यांनीही मोठ्या गटांगळ्या खाल्ल्या आहेत. हे  सर्व आघाडीचे शेअर  2.5% ते 6% च्या दरम्यान घसरले आहेत. अमेरिकेतील प्रमुख बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनलीने सर्वात मोठा फटका खात 4% ची घसरण नोंदवली. (After Indian stock market, US market tanks, Amazon to Tesla, big stocks falls)

अधिक वाचा : Federal Reserve : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ, 28 वर्षांतील सर्वात मोठी वाढ

अमेरिकन स्टॉक मार्केट उघडताच, आणखी एक निर्देशांक - डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 692.04 अंकांनी किंवा 2.26% खाली 29,976.49 अंशांच्या पातळीवर आला. तर Nasdaq कंपोझिट 355.94 अंकांनी किंवा 3.21% खाली घसरत 10,743.21 अंशांवर व्यवहार करत होता. आता अमेरिकेतील या घसरणीचा आणखी काय विपरित परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होतो याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 16 June 2022: सोन्याच्या भावात वाढ, मात्र अजूनही उच्चांकीपेक्षा स्वस्त...गुंतवणुकीची चांगली संधी!

भारतीय शेअर बाजाराला धक्का

घसरणीचा जागतिक कल, महागाईची चिंता आणि परकी संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या भांडवलाच्या प्रवाहामुळे भारतीय शेअर बाजारात घसरगुंडी उडाली आहे. गुरुवारी BSE सेन्सेक्स 1,045.60 अंश किंवा 1.99 टक्क्यांनी घसरून 51,495.79 वर बंद झाला. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 3,824.49 अंकांनी म्हणजेच 6.91 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 15.74 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम शेअर बाजारावर होतो आहे. 1994 नंतरच्या दशकातील सर्वाधिक मोठ्या महागाईमुळे मंदीच्या चिंतेचा सामना करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात जबरदस्त वाढ करण्यात सुरूवात केल्यानंतर गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक घसरले. व्याजदराच्या वाढीमुळे शेअर्सच्या किंमतींना विक्रीचा फटका बसला.

अधिक वाचा : First private train in India : रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाची घटना! भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोईम्बतूर येथून शिर्डीसाठी रवाना

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह धोरण

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने 75 बेसिस पॉइंट रेटने बाजाराच्या अपेक्षेशी जुळवून घेतल्यानंतर बेंचमार्क निर्देशांकाने बुधवारी पाच सत्रातील तोट्याचा प्रवास सुरू केला. वाढत्या महागाई आणि उच्च कर्ज खर्चाच्या वाढत्या चिंतेमुळे इक्विटीजवर वर्षभर दबाव आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या मंद होत चाललेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या ताज्या अंदाजामुळे आणि येत्या काही महिन्यांत वाढणाऱ्या बेरोजगारीच्या अंदाजामुळे या चिंतेमध्ये आणखी भर पडली आहे.

मंदी आणि उच्च बेरोजगारी महागाईला आवर घालण्यासाठी पावले उचल्याची शक्यता जाणकारांना दिसते आहे. त्यामुळे  बाजारावर अशा प्रकारचे उदास  चित्र दिसते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी